Ajit Agarkar | विकेट्स आणि धावांचं वेगवान ‘अर्धशतक’, लॉर्डसवर सेंच्युरी, हॅप्पी बर्थडे आगरकर
अजित आगरकरचा आज 43 वा वाढदिवस आहे.
मुंबई : सडपातळ अगंकाठी, गोरा पाण चेहरा असलेला मुंबईकर मुलगा अजित आगरकरचा आज 43 वा वाढदिवस (Ajit Agarkar 43 Birthday). आगरकरने टीम इंडियासाठी एकदिवसीय,कसोटी आणि टी 20 या तिन्ही प्रकारात प्रतिनिधित्व केलं आहे. एक खेळाडू म्हणून आगरकरची क्रिकेटमध्ये स्वप्नवत अशी कामगिरी राहिली आहे. आगरकरने अनेकदा उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अनेक दिग्गज फलंदाजांनाही न जमलेली कामगिरी अजित आगरकरने केलेली आहे. आगरकरच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याची कामगिरी आणि उल्लेखनीय विक्रम पाहणार आहोत. Fastest half century of wickets and runs Century at Lords Happy Birthday Ajit Agarkar
☝️ Fastest ?? player to 50 ODI wickets? Fastest ODI fifty for India? One of only three Indians to score 1000 runs and take 200 wickets in men's ODIs? A Test ton at Lord's in 2002
Happy birthday to @imAagarkar ? pic.twitter.com/GsXGIdQaW1
— ICC (@ICC) December 4, 2020
एकदिवसीय कारकिर्द
आगरकरने ऑस्ट्रेलियाविरोधात 1 एप्रिल 1998 मध्ये एकदिवसीय पदार्पण केलं (Ajit Agarkar Odi Cricket). आगरकरने एकूण 191 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाकडून 288 विकेट्स घेतल्या. 42 धावा देऊन 6 विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. तसेच त्याने 14.59 च्या सरासरीने 3 अर्धशतकांसह 1 हजार 269 धावा केल्या आहेत. 95 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. अजित आपला शेवटचा एकदिवसीय सामना पाकिस्तानविरोधात 13 जानेवारी 2006 ला खेळला होता.
349 international wickets ?2007 World T20-winner ?Fastest Indian (Men's) to 50 ODI wickets ?Fastest Indian (Men's) to score an ODI fifty ?
Here's wishing @imAagarkar a very happy birthday. ?? #TeamIndia pic.twitter.com/FODno9Zs9P
— BCCI (@BCCI) December 4, 2020
कसोटी कारकिर्द
आगरकरने 7 ऑक्टोबर 1998 ला झिंबाब्वेविरोधात कसोटी पदार्पण (Ajit Agarkar Test) केलं. त्याने एकूण 26 कसोटी सामन्यातील 46 डावात 58 विकेट्स घेतल्या आहेत. 41 धावा देऊन 6 विकेट्स ही अजितची कसोटीमधील सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. तसेच त्यानं 1 कसोटी शतकासह 571 धावा केल्या आहेत.
टी 20 कारकिर्द
अजितला एकदिवसीय आणि कसोटीच्या सामन्यांच्या तुलनेत टी 20 सामने फार कमी खेळायला मिळाले. अजितने केवळ 4 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 3 विकेट्स आणि 15 धावा केल्या.
वेगवान 50 आणि 150 विकेट्स
आगरकर टीम इंडियाकडून वेगवान 50 आणि 150 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे (Fastest 50 And 150 Wickets By India Bowler). अजितने 18 वर्षांपूर्वी टीम इंडियाकडून सर्वात कमी डावात 150 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याचा हा 18 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड अजूनही अबाधित आहे. त्याचा हा विक्रम अजूनही कोणत्याच भारतीय गोलंदाजाला ब्रेक करता आला नाहीये. आगरकरने 23 एकदिवसीय सामन्यात वेगवान 50 विकेट्स घेतल्या. तर 97 सामन्यात वेगवान 150 विकेट्स पूर्ण केल्या. अशी वेगवान कामगिरी करणारा आगरकर हा एकमेव भारतीय गोलंदाज राहिला आहे.
फास्टेस्ट फिफ्टी
टीम इंडियाकडे एकसेएक आक्रमक फलंदाज होते आणि आहेत. मात्र आगरकरने 20 वर्षांपूर्वी केलेला विक्रम अजूनही कोणत्याच फलंदाजाला मोडता आलेला नाही. अजितने टीम इंडियाकडून एकदिवसीय सामन्यात वेगवान अर्धशतकी खेळी करण्याची कामगिरी केली. ही कामगिरी त्याने 2000 मध्ये झिंबाब्वेविरोधात केली होती. आगरकरने 21 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. या सामन्यात आगरकरने नाबाद 67 धावांची खेळी केली होती. तर गोलंदाजी करताना 3 विकेट्सही घेतल्या होत्या.
लॉर्ड्सवर कसोटी शतक
लॉर्डस, क्रिकेटची पंढरी. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत लॉर्ड्सवर शतकी खेळी करावी, हे स्वप्न प्रत्येक फंलदाजाचं असतं. मात्र लॉर्ड्सवर शतक ठोकायचं म्हणजे खायचं काम नाही. भल्या भल्या दिग्ग्ज फलंदाजांना लॉर्ड्सवर शतक ठोकता आलेलं नाही. अगदी शतकाचं शतक ठोकणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही लॉर्ड्सवर शतक ठोकता आलं नाही. मात्र अजितने लॉर्डसवर शतक लगावण्याची कामगिरी केली.
गोष्ट आहे 25 जुलै 2002 ची. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात कसोटी सामना खेळला जात होता. इंग्लंडने टीम इंडियाला पहिल्या डावात 487 धावांच आव्हान दिलं. मात्र टीम इंडियाला प्रत्युतरादाखल 221 धावाच करता आल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने 301 धावा केल्या. यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 568 धावांचं तगडं आव्हान मिळालं. या दुसऱ्या डावात सामन्याच्या शेवटच्या दिवशी (29 जुलै) आगरकरने शानदार शतक झळकावलं. आगरकरने एकूण 109 धावांची खेळी केली.
Scoring your only Test century at Lord's ?
? #OnThisDay in 2002, @imAagarkar made the Honours Boards.#LoveLords
— Lord's Cricket Ground (@HomeOfCricket) July 29, 2020
संबंधित बातम्या :
India vs Australia 1st T20 Update : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने, कोण ठरणार वरचढ
Fastest half century of wickets and runs Century at Lords Happy Birthday Ajit Agarkar