IPL 2022, GT vs RR : गुजरात फायनलमध्ये, आयपीएलमधील टॉप संघांची कामगिरी जाणून घ्या…

आयपीएलचा पॉईंट्स टेबल बघितल्यास गुजरात टायटन्स पहिल्या स्थानी आहे. या संघाने एकूण चौदा सामने खेळवले आहेत.

IPL 2022,  GT vs RR : गुजरात फायनलमध्ये, आयपीएलमधील टॉप संघांची कामगिरी जाणून घ्या...
मिलर आणि हार्दिक Image Credit source: social
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 7:01 AM

कोलकाता : आयपीएलच्या (IPL 2022) चालू सीझनमधील पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला गेला. यात गुजरातने आपला विजयीरथ कायम ठेवत थेट फायनमध्ये धडक मारली आहे. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 6 विकेट गमावून 188 धावा करत गुजरात टायटन्सला विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य दिले. जोस बटलरने (Jos Butler)  सर्वाधिक 89 धावांचे योगदान दिले. त्याने 56 चेंडूंच्या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार मारले. डावाच्या शेवटच्या षटकात तो धावबाद झाला. अटीतटीचा हा सामना शेवटच्या शटकापर्यंत पोहोचला होता. या सामन्याचा चांगलाच थरार यावेळी प्रेकांना अनुभवता आता. हरणाऱ्या संघाला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. त्यामुळे राजस्थानच्या आशा अजूनही जिवंत आहे. दरम्यान, आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये काय बदल झालाय ते पाहुया..

आयपीएलमधील  टॉप संघ

आयपीएलचा पॉईंट्स टेबल बघितल्यास गुजरात टायटन्स पहिल्या स्थानी आहे. या संघाने एकूण चौदा सामने खेळवले असून त्यापैकी गुजरातला दहा सामन्यात जिंकता आलंय. तर चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातला वीस पॉईंट्स आहेत. तर गुजरातचा नेटरेट 0.316 इतका आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहे. या संघाने एकूण चौदा सामने खेळवले असून त्यापैकी त्यांना नऊ सामन्यात यश आलंय. तर पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. राजस्थानला पॉईंट्स टेबलमध्ये एकूण अठरा पॉईंट्स मिळाले आहेत. तर राजस्थानचा नेटरेट 0.298 आहे. तिसऱ्या स्थानी लखनौ सुपर जायंट्स असून या संघाने एकूण चौदा सामने खेळवले आहेत. त्यापैकी त्यांना नऊ सामन्यात विजय मिळवता आलाय. तर पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. लखनौचा नेटरेट 0.251 आहे. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये लखनौला अठरा पॉईंट्स मिळाले आहेत. चौथ्या स्थानी बंगळुरू संघ असून या संघाने एकूण चौदा सामने खेळवले आहेत. बंगळुरूने आठ सामन्यात यश मिळवलंय तर सहा सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. बंगलुरूचा नेटरेट -0253 आहे. बंगळुरूला पॉईंट्स टेबलमध्ये सोळा गुण मिळाले आहेत.

हे सुद्धा वाचा

कुणाची बॅटिंग चमकली?

या महत्वाच्या सामन्यात सुरूवातीला राजस्थानकडून जॉस बटलरने तुफान फटकेबाजी करत राजस्थानला मजबूत स्थितीत पोहोचवले. मात्र दुसऱ्या डावात गुजरातच्या विकेट सुरूवातीला कोसळत असताना हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलरने चांगली भागिदारी करत हा विजय खेचून आणला. सुरूवातील शांत खेळणारा डेव्हिड मिलरच राजस्थानसाठी किलर ठरला. त्याने शेवटी तुफान फटकेबाजी केली. त्यामुळे अवघड दिसणार हा विजय गुजरातसाठी सोपा बनला.

अश्विनने 4 षटकात 40 धावा दिल्या

ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने आपल्या कोट्यातील शेवटच्या षटकात 14 धावा दिल्या. अश्विन खूप महागडा ठरला आहे आणि त्याने 4 षटकात 40 धावा दिल्या, ही सध्याच्या सीझनमधील त्याची सर्वात खराब कामगिरी आहे. गुजरातकडून बॅटिंगचा मोर्चा कर्णधार हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलरने सांभाळला. सुरूवातील गुजरातच्या विकेट लवकर पडल्यावर सामना फिरतोय असे वाटत असताना त्यांनी तुफान फटाकेाबाजी करत सामना जिवंत ठेवला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.