सरदारचा नाद नाही करायचा! हरभजन सिंहने पाकड्यांची काढली इज्जत, कशावरून पेटला वाद?
भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह उर्फ भज्जी चांगलाच भडकला आहे. पाकिस्तानवाल्यांनी त्याची खोड काढली मग तो सोडत असतो का? हरभजनने त्यांची लायकी त्यांना दाखवून देत निशाणा साधला.
भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह निवृत्त झाला असला तरी कायम चर्चेत असतो. क्रिकेट खेळताना देशासाठी अनेक विक्रम आपल्या नावावर करण्यासोबतच कट्टर शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानविरूद्ध भज्जीने आक्रमक भूमिका घेतली होती. आता मैदानाच्या बाहेरूनही तो पाकिस्तानला भिडताना दिसत आहे. अशातच सोशल मीडियालवर पाकिस्तान आणि भज्जीमधील वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. भज्जीने पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून दिलीये. नेमका हा वाद कशावरून सुरू आहे ते जाणून घ्या.
नेमका काय आहे वाद?
चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र बीसीसीआयने टीम इंडियाला सुरक्षेच्या कारणास्तव तिथे पाठवण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला आहे. यासंदर्भातील हरभजन सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हरभजन बोलत आहे की, भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी जाऊ नये. बीसीसीआयने टीम इंडियाला न पाठवण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य असून माझा त्याला पाठिंबा असल्याचं भज्जी व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. यानंतर पाकिस्तानच्या एका पत्रकाराने एक स्क्रिनशॉट शेअर करत हरभजन सिंहला डिवचलं.
पत्रकाराने शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये, भारत-पाक सामन्यात शाहिद आफ्रिदी याने हरभजनला सलग चार षटकार मारले होते. कॅप्शनमध्ये, हरभजन सिंहला यामुळेच पाकिस्तानमध्ये जाण्याची भीती वाटत आहे. हरभजन सिंह ही पोस्ट पाहून चांगलाच पेटला. हरभजनने लगोलग उत्तर देत 2009 साली पाकिस्तानमध्ये श्रीलंका संघावर झालेल्या हल्ल्याची आठवण करून दिली. श्रीलंका संघ स्टेडियमच्या दिशेने जात असतानाा खेळाडूंच्या गाडीवर हल्ला झाला होता.
No not for this . Cricket Mai Jeet har lagi rehti hai. I will tell u the real problem is this . Check the photo ⬇️ . Now get the F…. out of here . F ka Matlab samaj aa gya hoga ya samjau? F means ur name . Plz don’t think what u r thinking th meaning of F. You know what I mean… https://t.co/BLz6TRwcB3 pic.twitter.com/bqrGlro7tC
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) August 1, 2024
हरभजन याने फोटो शेअर करत सांगितलं की, बाकी कशासाठी नाही. खरी अडचण काय आहे ते एकदा पाहून घे. इथून निघ आता. F या शब्दाचा अर्थ तुला समजतो की ते पण तुला समजवू? F नावाचा अर्थ म्हणजे ते तुझं ना असून आता समजून घे मला काय म्हणायचं आहे, असं म्हणत हरभजन सिंह पाकिस्तानवाल्यांना उत्तर दिलं.