‘मी आऊट झालो, धोनीने ड्रेसिंग रूममध्ये जोरात लाथ मारली…’; सीएसकेच्या जुन्या खेळाडूचा खळबजनक खुलासा
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन कर्णधार म्हणून एम. एस. धोनी ओळखला जातो. त्यासोबतच त्याला कॅप्टन कूलही म्हटलं जातं. पण धोनी किती रागीट आहे याबाबत सीएसकेच्या माजी खेळाडूने मोठा खुलासा केला आहे.
1 / 5
महेंद्र सिंह धोनी याने आपल्या नेतृत्त्वात टीम इंडियाला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन कूल दिवसेंदिवस तरूण होत चालला आहे. धोनी आताही आयपीएल खेळत असून त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची आयपीएलच्या प्रत्येक सामन्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
2 / 5
धोनीनाे आपल्या नेतृत्त्वात सीएसकेलाही पाच ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी सीएसके आणि मुंबई इंडियन्स या दोन टीम्सने जिंकल्या आहेत. धोनीबाबत अनेक गोष्टी आता जुने खेळाडू त्यांच्या मुलाखतीमध्ये बोसताना दिसतात.
3 / 5
सीएसकेच्या माजी खेळाडूने धोनीबाबत मोठा खुलासा केला आहे. धोनीला राग येतो की नाही हे त्याने सांगितलेच. पण धोनी त्यावेळी कशा प्रकारे तो व्यक्त करतो हेसुद्धा सांगितलं आहे. एस बद्रीनाथ याने याबाबत सांगितलंय.
4 / 5
आरसीबी विरुद्ध सीएसके सामना होता. चेन्नईला 110 धावांचे टार्गेट चेस करता आले नाही. मी अनिल कुंबळेच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झालो. आऊट झाल्यानंतर मी ड्रेसिंग रूममध्ये उभा होतो आणि धोनी आत येत होता. त्यानंतर त्याने रागाच्या भरात पाण्याच्या बाटलीला लाथ मारली, जी खूप दूर गेल्याचं बद्रीनाथने सांगितलं.
5 / 5
दरम्यान, आगामी आयपीएल 2025 मध्ये महेंद्र सिंह धोनी खेळणार की नाही याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. मेगा लिलाव असल्याने बीसीसीआयची रिटेन पॉलिसी कशी असणार हे पाहणेही महत्त्वाचं ठरणार आहे.