No Run Out : भारताच्या हा खेळाडू 16 वर्षांच्या करियरमध्ये कधीच नाही झाला रन-आऊट, पाहा कोण?

| Updated on: Sep 01, 2024 | 4:05 PM

क्रिकेटमध्ये रोज नवनवीन विक्रम रचले जात आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये आता 250 धावा चोपल्या जात आहे. बर इतकंच नाहीतर या धावांचा यशस्वीपणे पाठलागही होत आहे. भारतात अनेक दिग्गज खेळाडू झाले असून वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का भारताचा एक खेळाडू आपल्या कारकिर्दीमध्ये रन आऊट झाला नाही.

1 / 5
भारतीय संघाचा एक माजी खेळाडू जो आपल्या 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये कधीही रनआऊट झाला नाही. अनेक सामन्यात काही खेळाडू दमदार फलंदाजी करत असतात मात्र रन आऊट झाल्यामुळे त्यांना माघारी परतावं लागतं.

2 / 5
काही सामने तर खेळाडू रन आऊट झाल्यामुळे पलटले आहेत. कसोटी, वनडे किंवा टी-20 क्रिकेटमध्ये अटीतटीच्या सामन्यात मुख्य फलंदाज तळापर्यंत खेळत असेल, पण तो रन आऊट झाल्यामुळे सामन्याचे निकाल बदलेले आहेत.

3 / 5
आपल्या 16 वर्षांच्या करियरमध्ये आऊट न झालेला हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून कपिल देव आहे. कपिल देव आपल्या करियरमध्ये कधीही रन आऊट झाला नाही.

4 / 5
भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव याने भारतासाठी 131 कसोटी आणि 225 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 5248 आणि 3783 धावा केल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 687 विकेट घेतल्या आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक महान अष्टपैलू खेळाडू आहेत.

5 / 5
कपिल देव यांनी आपल्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाला 1983 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला होता. कपिल देव हा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू इयान बॉथमनंतर जगातील दुसरा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मानला जातो.