“आता वेळ आलीये वनडे वर्ल्ड कप 40 ओव्हरचा करण्याची”, दिग्गज खेळाडूची मागणी

| Updated on: Mar 14, 2023 | 12:34 AM

यंदाचा आगामी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 भारतात होणार आहे. 40 ओव्हर ठेवण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. तुम्हालाही प्रश्न पडेल अशी मागणी का?

आता वेळ आलीये वनडे वर्ल्ड कप 40 ओव्हरचा करण्याची, दिग्गज खेळाडूची मागणी
Follow us on

मुंबई : यंदाचा आगामी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 भारतात होणार आहे. अवघ्या काही महिन्यांवर आयसीसीची स्पर्धा येऊन ठेपली असताना एका माजी खेळाडूने आगामी वर्ल्ड कपमध्ये 40 ओव्हर ठेवण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. तुम्हालाही प्रश्न पडेल अशी मागणी का? यावरही संबंधित माजी खेळाडूने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एकदिवसीय सामने पाहण्यासाठी प्रेक्षक पाट फिरवताना दिसत आहेत. त्यामुळे यावर तोडगा म्हणून सामने 40 ओव्हर्सचे ठेवावेत, असं रवी शास्त्री म्हणाले. यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की, कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 1983 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला तेव्हा ही स्पर्धा 60 षटकांची असायची पण नंतर ती 50 पर्यंत कमी करण्यात आली.

मी हे म्हणतोय कारण 1983 मध्ये जेव्हा आम्ही विश्वचषक जिंकलो तेव्हा तो 60 षटकांचा सामना असायचा. त्यानंतर लोकांचे त्याकडे असलेले आकर्षण कमी झाले, मग ते 50 षटकांचे झाले. मला वाटते की आता 40-40 षटकांची वेळ आली आहे. काळाबरोबर बदलणे आवश्यक असल्याचं शास्त्री म्हणाले. दिनेश कार्तिक यानेही यावर आपलं मत मांडताना समर्थन दिलं आहे.

दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटची क्रेझ कमी होत चालली आहे. लोकांना कसोटी क्रिकेट बघायचे आहे, जे क्रिकेटचे खरे स्वरूप आहे आणि T20 हे मनोरंजनासाठी आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणारा विश्वचषक हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो, असं दिनेश कार्तिक म्हणाला.