भारताकडून काहीतरी शिका, मोहम्मद आमीरची पाकिस्तान सोडण्याची तयारी, ‘या’ देशाचं नागरिकत्व स्वीकारणार

मोहम्मद आमिरने (Mohammad Aamir) काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. दरम्यान त्याने आता इंग्लंडच्या नागरिक्तवासाठी (applied for England citizenship) अर्ज केला आहे.

भारताकडून काहीतरी शिका, मोहम्मद आमीरची पाकिस्तान सोडण्याची तयारी, 'या' देशाचं नागरिकत्व स्वीकारणार
Former Pakistan fast bowler Mohammad Aamir
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 6:29 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने (Mohammad Amir) पाकिस्तानचं नागरिक्तव सोडण्याचं मन बनवलं आहे. मोहम्मदने गुरुवारी 13 मे ला (England citizenship) इंग्लंडचं नागरिक्त्व मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. मोहम्मदला इंग्लंडचे नागरिक्तव मिळाल्यास त्याला अनेक देशातील विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळेल. तसेच त्याला आयपीएलमध्येही खेळता येईल. काही वर्षांपासून आयपीएलमध्ये पाकिस्तान खेळाडूंना खेळवण्यात येत नाही. मोहम्मदने जानेवारी महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तेव्हापासून तो कुटुंबियांसोबत इंग्लंडमध्ये स्थायिक झाला आहे. मोहम्मदने काही दिवसांपूर्वी एका इंटरव्यूमध्ये भारताचं कौतुक केलं होतं. सोबतच त्याने पाकिस्तानच्या निवड समितीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. (Former Pakistan fast bowler Mohammad Aamir has applied for England citizenship)

“भारत-इंग्लंडकडून काहीतरी शिका”

मोहम्मदने पाकिस्तानच्या निवड समितीच्या खेळाडूंची निवड करण्यावरुन निशाना साधला. निवड समिती खेळाडूंना कमी वयातच आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी देत आहे. त्यांनी दुसऱ्या देशांचा आदर्श घ्यायला हवा. ” भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंडला पाहा, ते ज्या पद्धतीने खेळाडूंची निवड करतात ते पाहा. त्या देशाचे सर्व खेळाडू हे राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी परिपूर्ण असतात. त्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पदार्पणाआधी स्थानिक पातळी आणि प्रथम श्रेणीमध्ये अनेक सामने खेळलेले असतात. त्यामुळे ते पूर्णपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार असतात. ते खेळाडू आपली छाप सोडतात”, असं मोहम्मद पाक पॅशनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

“भारताचंच उदाहरण घ्या. सूर्यकुमार यादव, कृणाल पंड्या आणि इशान किशनला पाहा. त्यांनी जेव्हा आपला पहिला सामना खेळला तेव्हा त्यांना आणखी प्रशिक्षणाची गरज आहे, असं अजिबात वाटत नाही. या खेळाडूंनी अनेक वर्ष फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खेळले आहेत. तसेच आयपीएलमुळे त्यांना अधिक फायदा झाला आहे”, असंही मोहम्मदने स्पष्ट केलं. दरम्यान मोहम्मदला इंग्लंडचे नागरिक्तव मिळाल्यास त्याला आयपीएलचे दरवाजे खुले होतील. त्यामुळे मोहम्मदला इंग्लंडचे नागरिक्त्व मिळणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

मोहम्मद आमिरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

मोहम्मद आमिरने वयाच्या 17 व्या वर्षी 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. आमीरने त्याच्या स्विंगने छाप पाडली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत तो स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात तो सापडला. या फिक्सिंगमुळे आमीरवर 2010 मध्ये 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. जुलै 2016 मध्ये त्याने पुनरागमन केलं.

पाकिस्तानने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या चॅम्पियन ट्रॉफीचं विजेतेपद मिळवून देण्यात आमीरने मोलाची भूमिका बजावली. त्याने टीम इंडियाविरोधातील अंतिम सामन्यात शानदार गोलंदाजी केली. आमिरने पाकिस्तानकडून 36 कसोटी, 61 एकदिवसीय आणि 50 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 250 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान याआधी जून 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती.

संबंधित बातम्या :

मोहम्मद आमीरचा क्रिकेटला रामराम, पाक क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप

पाकिस्तानच्या खेळाडूंचा यू टूर्न सुरुच, निवृत्ती घेणारा मोहम्मद आमीर पुन्हा परतणार, पण एका अटीवर…

(Former Pakistan fast bowler Mohammad Aamir has applied for England citizenship)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.