‘टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांना भारतरत्न देण्यात यावा’; ‘या’ दिग्गज खेळाडूची मागणी

Rahul Dravid Bharat Ratna : टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोच राहुल द्रविड याला भारतरत्न द्यावा अशी मागणी एका वर्ल्ड कप विनर खेळाडूने केली आहे.

'टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांना भारतरत्न देण्यात यावा'; 'या' दिग्गज खेळाडूची मागणी
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 5:40 PM

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपवर टीम इंडियाने आपलं नाव कोरत इतिहास रचला. भारतीयांनी आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी 11 वर्षांची वाट पाहावी लागली. टीम इंडिया फायनल किंवा सेमी फायनलपर्यंत पोहचत होती. मात्र तिथून पुढच्या प्रवासात ते अपयशी ठरत होते. वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलेलं. हा पराभव फक्त अकरा खेळाडूंचा नाहीतक करोडो भारतीयांचा होता. त्यानंतर टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये जखमी वाघासारखी टीम इंडिया लढली आणि विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

या सगळ्यामध्ये पडद्यामागील कलाकाराची भूमिका बजावणारे  म्हणजे कोच  राहुल द्रविडने साकारली. शांत डोक्याने सर्व काही विचार करत गेमप्लान करणाऱ्या द्रविडचाही या विजेतेपदामध्ये तितका मोलाचा वाटा आहे. अशातच दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी द्रविडला भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. द्रविडला भारतरत्न पुरस्कार देण्यामागे सुनील गावसकर यांनी कारणेही सांगितली आहेत.

राहुल द्रविडने हा वर्ल्ड जिंकवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र त्याच्यापेक्षा जास्त योगदान द्रविडचं आहे. आपल्या कोचिंग काळात द्रविडने नवीन खेळाडू तयार केले. इतकंच नाहीतर ज्यावेळी ते खेळायचा तेव्हा अनेक अवघड सामने जिंकवलेले. इतकंच नाहीतर द्रविड कॅप्टन असताना परदेशात आपल्या नेतृत्त्वात मालिका जिंकवली. त्यावेळी मालिका जिंकणं सोडा एक सामनाही जिंकणं अवघड होतं, असं सुनील गावसकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, द वॉल म्हणून राहुल द्रविड याला ओळखलं जातं, परदेशी भूमित खेळताना टीम इंडियाच्या खेळाडूंची पळताभुई होऊन जायची. मात्र त्यावेळी टीम इंडियाकडून मैदानात एखाद्या योद्ध्यासारखा द्रविड लढत राहायचा. विरोधी टीमचे खेळाडू थकून जायचे. त्यानंतर द्रविड-लक्ष्मण ही जोडी मैदानात असल्यावर टीम इंडिया विरोधी टीमवर दबाव निर्माण करायची. द्रविडसोबत एक वाईट घडलं ते म्हणजे 2007 साली टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडली. त्यावेळी राहुल द्रविड टीम इंडियाचा कॅप्टन होता. मात्र या पराभवानंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.