Vinod Kmabli video : काय होता अन् काय झाला, विनोद काबंळीला चालताही येईना, Video पाहून सर्वांनाच बसला धक्का
Vinod Kambli Viral Video : टीम इंडियाचा माजी खेळाडू ज्याच्या बॅटींग सचिन तेंडुलकरपेक्षाही दमदार असल्याचं बोललं जात होतं. हा खेळाडू म्हणजे विनोद कांबळी त्याची झालेली अवस्था पाहून सर्वांना धक्का बसला आहे.
भारताचा माजी खेळाडू विनोद कांबळीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. विनोद कांबळीची या व्हिडीओमधील अवस्था पाहून सर्वांनाच धक्का बसला. विनोद कांबळी याला चालताही येत नसल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये त्याच्याजवळ असलेली काही लोक त्याला हाताला पकडून बसवत असल्याचं दिसत आहे. एकेकाळी सचिन तेंडुलकरपेक्षा दमदार खेळ असणाऱ्या खेळाडूची झालेली ही अवस्था झाल्याने क्रिकेट चाहतेही आश्चर्यचकित झाले. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.
विनोदी कांबळी व्हायरल व्हिडीओमध्ये काय?
एका गाडीच्या बाजूला विनोद कांबळी हा उभा असलेला दिसला. त्यानंतर तो चालण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा पायही पुढे टाकता आला नाही. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एक व्यक्तीने हाथ पकडल्यावर तो पुन्हा चालण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र विनोद कांबळीला तरीसुद्धा चालणं अवघड होऊन जातं. आणखी दोघेजण त्याला पकडतात आणि मदत करतात. परंतु तरीही त्याला चालतचा येत नसल्याने त्याची ती धडपड पाहून क्रिकेट चाहत्यांना वाईटही वाटलं.
विनोद कांबळीचा व्हायरल Video
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर असलेल्या विनोद कांबळीची काय अवस्था झालीये, क्रिकेट चाहत्यांनाही धक्का #Teamindia #VinodKambli #viralvideo #म pic.twitter.com/rMkn6azF0F
— Harish Malusare (@harish_malusare) August 6, 2024
विनोद कांबळी भारताचा स्टार खेळाडू होता. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसोबत शालेय जीवनापासून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरूवात केली होती. भारतासाठी विनोद कांबळी याने 1991 मध्ये शारजाह येथे पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं होतं. त्यानंतर 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलेलं. यामध्ये 17 कसोटी सामन्यात 1084 धावा केल्या होत्या. यामध्ये दोन द्विशतक, चार शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता. 227 ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. तर विनोदने 104 वन डे सामन्यात 2477 धावा केल्य असून यामध्ये दोन शतके आणि चौदा अर्धशतकांचा समावेश आहे. तर 106 ही त्याची सर्वोच्चा धावसंख्या आहे.
दरम्यान, विनोद कांबळी याची अशी अवस्था पाहून चाहत्यांना खूप वाईट वाटलं. अनेकांनी या व्हिडीओला कमेंट करत कांबळीबाबत दु:ख वाटत असल्याचं म्हटलं आहे. 52 वर्षीय कांबळी यांना यापूर्वीही आरोग्याच्या समस्या होत्या. 2013 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला लीलावती रुग्णालयात नेऊन त्याचा जीव वाचवला होता.