तेलंगणा निवडणुकीमध्ये टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचा अवघ्या इतक्या मतांनी पराभव

टीम इंडियाचा माजी कर्णधारही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र त्याला विजय मिळवण्यात अपयश आलं, कोण आहे तो खेळाडू ज्याला निवडणुकीच्या रिंगणात मॅन ऑफ द मॅच होता आलं नाही.

तेलंगणा निवडणुकीमध्ये टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचा अवघ्या इतक्या मतांनी पराभव
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 9:49 PM

मुंबई : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. 3 डिसेंबरला चार राज्यांचा निकाल लागला यामध्ये भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने आपला झेंडा फडकावला. (Telangana Assembly election result तर तेलंगणामध्ये काँग्रेसने केसीआर यांच्या बीआरस पक्षाला धक्का देत सत्तांतर केलं. तेलंगणा निवडणुकीमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधारही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र त्याला विजय मिळवण्यात अपयश आलं, कोण आहे तो खेळाडू ज्याला निवडणुकीच्या रिंगणात मॅन ऑफ द मॅच होता आलं नाही.

कोण आहे तो माजी कॅप्टन?

टीम इंडियाचा माजी कर्णधार दुसरा तिसरा कोणी नाहीतर मोहम्मह अझरूद्दीन आहे. तेलंगणामधील आपल्या होम ग्राऊंडवरून मोहम्मदने पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. मात्र त्याचा अवघ्या 16 हजार मतांनी पराभव झाला आहे. हैदराबादच्या जुबली हिल्स मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या अझरुद्दीन याचा बीआरएसचे विद्यमान आमदार मगंती गोपीनाथ यांनी पराभव केला.

गोपीनाथ यांना 80,549 मते मिळाली, अझरुद्दीनला 64,212 मते मिळाली. भाजपच्या लंकाला दीपक रेड्डी यांना 25,866 मते मिळाली होतीत. अझरूद्दीन हा तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे (TPCC) कार्याध्यक्ष आहे.  याच मतदार संघातून एआयएमआयएमच्या एम.डी. रशीद फराजुद्दीन यांना 7,848 मते मिळाली.

दरम्यान, 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मोहम्मद अझरूद्दीन उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद मतदारसंघातून निवडून आला होता. त्यानंतर 2014 साली राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूरमधून त्यांना निवडणुकीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपच्या सुखबीर सिंग जौनुपुरिया यांनी त्याला पराभूत केलं होतं. तेलंगणामध्ये आपल्या घरच्या मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. मात्र त्याला अपयश आलं आहे.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....