Captain : त्या एका खेळाडूच्या नेतृत्वात टीम इंडियाचे 4 कर्णधार खेळतात, कोण आहे तो?

Captaincy : टीम इंडियाचे असे 4 कर्णधार आहेत जे एका खेळाडूच्या नेतृत्वात खेळतात. जाणून घ्या तो 1 खेळाडू कोण आहे?

Captain : त्या एका खेळाडूच्या नेतृत्वात टीम इंडियाचे 4 कर्णधार खेळतात, कोण आहे तो?
team india national anthemImage Credit source: axar patel x account
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 11:27 PM

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील कसोटी मालिकेत 5 सामने खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसरा कसोटी सामना हा 6 डिसेंबरपासून अॅडलेड येथे होणार आहे. रोहित शर्मा या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. मात्र भारताचा एक असा खेळाडू आहे ज्याच्या नेतृत्वात टीम इंडियाचे 4 कर्णधार खेळतात. मात्र तो एक खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांपैकी नाही. हा खेळाडू ऑलराउंडर असून त्याने टीम इंडियाला आतापर्यंत अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत.

4 कर्णधारांचा कर्णधार कोण?

रोहित शर्मा याने टी 20I वर्ल्ड कपनंतर या सर्वात लहान फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. रोहित आता वनडे आणि टेस्टमध्ये कॅप्टन्सी करतो. रोहितनंतर सूर्यकुमार यादव टी 20 संघाची धुरा सांभाळतोय. जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे. बुमराह रोहित-सूर्याच्या अनुपस्थितीत भारताचं नेतृत्व करतो. तर तिलक वर्मा याने नुकत्याच झालेल्या एमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व केलं. अशापक्रारे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा हे चौघे भारतीय कर्णधार आहेत. मात्र या चौघांचा कर्णधार कोण? जाणून घेऊयात.

रोहित, सूर्या, बुमराह आणि तिलक या चौघांचा कर्णधार दुसरा तिसरा कुणी नसून हार्दिक पंड्या आहे. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात हे चौघे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स या टीमसाठी खेळतात. हार्दिक आयपीएलच्या 17 व्या हंगामापासून (IPL 2024) मुंबईचं नेतृत्व करतोय. तसेच हार्दिकच 18 व्या मोसमात नेतृत्व करणार आहे. मुंबईने या 5 खेळाडूंना मेगा ऑक्शन 2025 आधी रिटेन केलं होतं. तर मेगा ऑक्शनमधून काही खेळाडू आपल्या ताफ्यात घेतले.

आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जोफ्रा आर्चर, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकल्टन, दीपक चाहर, अल्लाह घझनफर, विल जॅक्स, केएल श्रीजीत, रीस टॉप्ली, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, वी. सत्यनारायण, बेवन जॅकब्स, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, लिज्जाड विलियम्स आणि अश्वनी कुमार.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.