IPL 2022: परफेक्ट यॉर्कर टाकणाऱ्याला न्याय मिळाला, वय नाही खेळ बघितला, टीम इंडियात निवड झालेल्या ‘त्या’ पाच जणांची चर्चा
IPL 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच T-20 आणि इंग्लंड विरुद्धच्या एका कसोटी सामन्यासाठी काल भारतीय संघ जाहीर करण्यात आला. अनेक नवीन खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळालीय, तर काहींनी कमबॅक केलय.
1 / 5
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच T-20 आणि इंग्लंड विरुद्धच्या एका कसोटी सामन्यासाठी काल भारतीय संघ जाहीर करण्यात आला. अनेक नवीन खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळालीय, तर काहींनी कमबॅक केलय. आयपीएलमध्ये जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीप सिंगसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडलेत. त्याची टीम इंडियात निवड झाली आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्सकडून खेळतोय. डेथ ओव्हर्समध्ये परफेक्ट यॉर्कर त्याची खासियत आहे. 23 वर्षाच्या या युवा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने 10 विकेट घेतल्यात.
2 / 5
दिनेश कार्तिकने तब्बल 3 वर्षानंतर टीम इंडियात कमबॅक केलं आहे. कार्तिक 36 वर्षांचा असला, तरी सध्या तो जबरदस्त फलंदाजी करतोय. त्याने 14 सामन्यात 287 धावा केल्यात. आरसीबीच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
3 / 5
आपल्या वेगाने दहशत निर्माण करणाऱ्या काश्मिरच्या उमरान मलिकची भारताच्या टी 20 संघात निवड झाली आहे. सनरायजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या उमरानने 13 सामन्यात 21 विकेट घेतलेत. 5/25 ही त्याची यंदाच्या सीजनमधली सर्वोत्तम गोलंदाजी आहे. ताशी 150 किमी वेगाने तो गोलंदाजी करतोय. त्याच्या गोलंदाजीत सातत्य आहे.
4 / 5
इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी चेतेश्वर पुजाराची भारताच्या कसोटी संघात निवड झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर त्याला डच्चू मिळाला होता. काऊंटीमध्ये पुजारा सातत्यपूर्ण फलंदाजी करतोय. त्याने शतक, द्विशतक झळकवली आहेत. काऊंटीत त्याने आठ डावात 720 धावा केल्यात. त्यामुळे त्याची पुन्हा कसोटी संघात निवड झाली आहे.
5 / 5
गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याने आपल्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केलय. आयपीएलमध्ये डेब्यू करणारा गुजरातचा संघ पहिल्या स्थानावर आहे. 13 डावात हार्दिकने 413 धावा केल्या. यात चार अर्धशतक आहेत. त्याशिवाय चार विकेटही काढल्या. गुजरातच्या विजयात त्याने महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्याची भारताच्या टी 20 संघात निवड झाली आहे.