Team India Jersey : टीम इंडियाची नवी जर्सी लाँच, पाहा कशी आहे नवी जर्सी
T20 World Cup 2022 Team India Jersey : टीम इंडियाच्या जर्सीचा रंग कोणता असणार याची चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून आहे. याचं उत्तर तुम्हाला आम्ही देणार आहोत. याविषयी जाणून घ्या...
नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकासाठी (t20 world cup) जवळपास सगळ्याचं टीमची घोषणा झाली आहे. भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानच्या संघाची घोषणा होऊन अनेक संघांनी जर्सी (Jersey) कोणती असणार हे देखील जाहीर केलंय. यातच आता टीम इंडिया (Team India) यावेळेस आपला जुनाच रंग दाखवणार असल्याचं दिसतंय. असं म्हणतात की जुनं ते सोनं. हेच टीम इंडियानं यावर्षी पाळल्याचं दिसतंय. टीम इंडियाच्या जर्सीचा रंग कोणता असणार याची चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून आहे. याविषयी आता एक मोठी माहिती समोर आली आहे. ती माहिती नेमकी काय आहे, हे जाणून घ्या…
बीसीसीआयचं ट्विट
To every cricket fan out there, this one’s for you.
Presenting the all new T20 Jersey – One Blue Jersey by @mpl_sport. #HarFanKiJersey#TeamIndia #MPLSports #CricketFandom pic.twitter.com/3VVro2TgTT
— BCCI (@BCCI) September 18, 2022
जर्सी लॉच
पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक सुरू होत आहे. या विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार म्हणून उतरणार आहे. या विश्वचषकापूर्वी शनिवारी टीम इंडियाची नवीन टी-20 जर्सी लॉच करण्यात आली आहे. टीम इंडियाची किट प्रायोजक एमपीएल स्पोर्ट्सने ही जर्सी लॉच केली. ही जर्सी आधीच्या जर्सीपेक्षा खूप वेगळी आहे. टीम इंडियाने मागच्या T20 वर्ल्ड कपमध्ये घातलेली जर्सी आणि या जर्सीच्या रंगात खूप फरक आहे.
जर्सीचा रंग?
- नवीन जर्सीचा रंग आकाशी निळा आहे. हा आधीच टीम इंडियाच्या जर्सीचा रंग आहे.
- खांद्यावर आणि हातांवर गडद निळा रंग आहे, हा पूर्वीच्या जर्सीचा रंग होता.
- यामध्ये अनेक त्रिकोण दिसतात. या जर्सीवर एमपीएल स्पोर्ट्स आणि बायजूचे नाव असून जर्सीच्या मध्यभागी भारत असे लिहिले आहे.
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतही टीम इंडिया हीच जर्सी परिधान करताना दिसणार आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषकात टीम इंडिया कदाचित याच जर्सीत दिसणार आहे. टीम इंडियाने जवळपास प्रत्येक T20 वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक वेळी नवीन जर्सी परिधान केली आहे. यावेळीही तेच होणार आहे. आता ही नवी जर्सी भारतीय संघासाठी लकी ठरते की नाही हे पाहावे लागेल.
पहिला T20 विश्वचषक जिंकला
2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला T20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर तो पुन्हा कधीही ट्रॉफी उचलू शकला नाही. 2014 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये पाऊल ठेवले पण विजय त्याच्या हाती आला नाही.