वर्ल्डकपपूर्वी गोलंदाजांची धाकधूक वाढली, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर त्या नियमामुळे मोठं दडपण

आयपीएल स्पर्धेचा ज्वर आता खेळाडूंवर चढला आहे. मात्र सर्वांचं लक्ष लागून आहे टी20 वर्ल्डकप स्पर्धेकडे.. या स्पर्धेत लागू होणाऱ्या नव्या नियमाबाबत धाकधूक वाढली आहे. कारण नव्या नियमामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर दडपण येणार आहे. विचार करण्यासाठी आता जास्तीचा वेळ मिळणार नाही.

वर्ल्डकपपूर्वी गोलंदाजांची धाकधूक वाढली, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर त्या नियमामुळे मोठं दडपण
Team India
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 5:32 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचा अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट झाल्यानंतर बराच वादंग झाला होता. फलंदाज मैदानात येण्यासाठीचा अवधी जास्त झाल्याने त्याला पंचांनी बाद केलं. त्यानंतर आयसीसी प्रशासन खडबडून जागं झालं. वेळेचं महत्त्व पटावं यासाठी आयसीसीने स्टॉप क्लॉक नियम लागू केला आहे. यासाठी डिसेंबर महिन्यापासून ट्रायल सुरु होती. आता हा नियम कायमस्वरूपी लागू होणार आहे. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला दोन षटकामधील अंतर पाळावं लागणार आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार आयसीसी हा नियम टी20 वर्ल्डकपपासून लागू करणार आहे. हा नियम टी20 सोबत वनडेतही लागू होणार आहे. नियमानुसार दोन षटकामधील अंतर हे 60 सेकंदाचं असणार आहे. म्हणजेच एका मिनिटाच्या आत दुसरं षटक सुरु करावं लागणार आहे. पहिलं षटक संपताच तिसरा पंच स्टॉप वॉच सुरु करणार आहे.

क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने या नियमाचं पालन केलं नाही तर दंडाची तरतूद केली आहे. हा नियम लागू करण्याची जबाबदारी सर्वस्वी पंचांची असणार आहे. एखाद्या संघाने वेळेत षटक सुरु केलं नाही तर मैदानातील पंच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दोन वेळा समज देतील. त्यानंतरही नियमांच उल्लंघन झालं तर पाच धावांची पेनल्टी लावली जाईल. टायमर कधी सुरु करायचं हा निर्णय सर्वस्वी पंचांचा असणार आहे. डीआरएस किंवा इतर कारणामुळे वेळ होत असल्यास पंचांना थांबावं लागेल.

आयसीसीने हा नियम डिसेंबर 2023 मध्ये प्रायोगिक तत्वावर लागू केला होता. याची मर्यादा एप्रिल महिन्यात संपत आहे. हा नियम फायदेशीर असल्याचं आयसीसी आणि क्रिकेट कमिटीला लक्षात आलं आहे. त्यामुळे आता हा निर्णय कायमस्वरूपी लागू होणार आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, यासाठी आयसीसीच्या बैठका सुरु असून यात या नियमाला मंजुरी दिली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होणार असून अंतिम सामना 29 जूनला आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये या स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध 5 जूनला आहे. त्यानंतर 9 जूनला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत सामना होणार आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.