VIDEO | विकेट गेल्यावर बॅटने खुर्ची उडवली, विराट कोहलीवर नियमभंगाचा ठपका
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (Sunrisers Hyderabad) सामन्यात ड्रेसिंग रुमकडे परतताना कोहलीने बॅटने खुर्ची उडवली होती. (Virat Kohli takes anger on chair)
IPL 2021 चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) रागावर नियंत्रण नसल्याबद्दल अनेकदा टीकेचा धनी ठरला आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (Sunrisers Hyderabad) सामन्यात ड्रेसिंग रुमकडे परतताना कोहलीने बॅटने खुर्ची उडवली. आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल कोहलीला फटकारण्यात आले आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादवर 6 धावांनी विजयही मिळवला. (Frustrated Virat Kohli takes anger on chair during SRH vs RCB IPL 2021 Match in Chennai)
चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना रंगला. 29 चेंडूत अवघ्या 33 धावा केल्यानंतर विराट कोहली बाद झाला. त्यामुळे संतापलेल्या कोहलीने पॅव्हेलियनकडे परतताना आरसीबीच्या डगआऊटमध्ये असलेली खुर्ची बॅटने उडवली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील क्रिकेटपटूही त्याच्याकडे पाहत राहिले.
पाहा व्हिडीओ
#RCBvsSRH Exasperated Virat Kohli caught on camera hitting a chair with his bat while walking off to pavilion after getting out tonight… ?#IPL2021 #IPL #ViratKohli #ABdeVilliers #BabarAzam pic.twitter.com/RENYiPPmb7
— khudro manush (@KhudroM) April 14, 2021
IPL प्रशासनाकडून गंभीर दखल
हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आयपीएल प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेतली. विराट कोहलीनेही आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्हा 2.2 चे उल्लंघन केल्याचे कबूल केले. आचारसंहितेच्या लेव्हल 1 च्या उल्लंघनासाठी सामन्याच्या रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे. (Frustrated Virat Kohli takes anger on chair during SRH vs RCB IPL 2021 Match in Chennai)
कोहलीने ग्लेन मॅक्सवेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 44 धावांची चांगली भागीदारी रचली होती, परंतु 13 व्या षटकाच्या सुरुवातीला कोहलीने टोलवलेला चेंडू विजय शंकरकडे धावत उत्कृष्टपणे झेलला.
बंगळुरुचा हैदराबादवर विजय
शाहबाज अहमदने एका ओव्हरमध्ये घेतलेल्या 3 विकेट्सच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादवर 6 धावांनी विजय मिळवला आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला बंगळुरुच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या.
बंगळुरुकडून शाहबाज अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. हैदराबादकडूने कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 54 धावांची खेळी केली
संबंधित बातम्या :
(Frustrated Virat Kohli takes anger on chair during SRH vs RCB IPL 2021 Match in Chennai)