गलती से मिस्टेक हो जाती है…! सूर्यकुमार यादवचा तो व्हिडीओ आयसीसीने केला पोस्ट, नेमकं काय झालं? पाहा Video

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताने जबरदस्त कामगिरी केली. अफगाणिस्तानला 47 धावांनी पराभूत करत उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी चमकदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवची या सामन्यापूर्वीची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. आयसीसीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

गलती से मिस्टेक हो जाती है...! सूर्यकुमार यादवचा तो व्हिडीओ आयसीसीने केला पोस्ट, नेमकं काय झालं? पाहा Video
Follow us
| Updated on: Jun 21, 2024 | 7:10 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताने अफगाणिस्तानचा 47 धावांनी धुव्वा उडवला. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली कामगिरी केली. आता भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला की उपांत्य फेरीतील स्थान पक्कं होईल. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेला सामोरा गेला होता. सामन्यानंतर पत्रकार परिषदेतील एक क्लिप आता व्हायरल होत आहे. पत्रकाराने सूर्यकुमार यादव याचा उल्लेख मोहम्मद सिराज असा केला. तेव्हा सूर्याने क्षणाचाही विलंब न करता या क्षणाचा आनंद घेत हसत उत्तर दिलं. “सिराज तर नाही. सिराज भाई जेवण करत आहे.” त्याच्या या उत्तरानंतर संघाची आत्मविश्वासपूर्ण मानसिकता प्रतिबिंबित झाली होती.

आयसीसीने या पत्रकार परिषदेतला व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं आहे की, “गलती से मिस्टेक, हो गया सूर्या भाई.” सूर्यकुमार यादवने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात वादळी खेळी केली. 28 चेंडूत तीन षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 181 धावापर्यंत मजल मारता आली.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहची जादू पुन्हा दिसली. त्याने 4 षटकात फक्त 7 धावा देत तीन गडी बाद केले. तसेच एक निर्धाव षटकही टाकलं. त्याच्या या स्पेलमुळे अफगाणिस्तानचा डाव 134 धावांवरच आटोपला. भारताचा सुपर 8 फेरीतील पुढचा सामना आता बांगलादेशशी आहे. 22 जूनला सर विवियन रिचर्ड स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणं सोपं ठरेल असं दिसतंय. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल.

दोन्ही संघाचे खेळाडू

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल, कुलदीप यादव, संजू सॅमसन , युझवेंद्र चहल.

बांगलादेश संघ: तन्झिद हसन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, तौहिद ह्रिदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, तन्झिम हसन साकिब, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तन्वीर इस्लाम, शरीफुल इस्लाम, सौम्या सरकार.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.