Gambhir Fights Sreesanth | क्रिकेटमध्ये भर मैदानात राडा, श्रीसंत-गंभीर एकमेकांना भिडले, व्हिडीओ तुफान व्हायरल
Gautam Gambhir Fights With S Sreesanth Legends League Cricke : टीम इंडियाच्या दोन खेळाडूंमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळाला आहे. गौतम गंभीर आणि एस श्रीसंत भर मैदानात एकमेकांना भिडले. पाहा नेमकं काय झालं होतं.
मुंबई : भारतामध्ये सुरू असलेल्या लीजेंड लीगमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर आणि एस. श्रीसंत दोघे भर सामन्यामध्ये एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले. बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्समधील सामन्यामध्ये हा वाद पाहायला मिळाला. सामना संपल्यानंतर एस श्रीसंतने व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्याने सांगितलं की नेमकं काय झालं होतं?
नेमकं काय झालं होतं?
पहिल्या ओव्हरमध्ये गंभीरने श्रीसंतला षटकार आणि चौकार मारला तिथूनच खरी या वादाला सुरूवात झाली होती. कारण दोघेही एकमेकांकडे खुन्नसने पाहत होते. काही वेळानंतर दोघेही भिडले. मैदानातील इतर खेळाडूंनी आणि पंचांनी मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळालं. सामना संपल्यानंतर एस श्रीसंतने यासंदर्भात खुलासा केला. गौतम गंभीर खूप चुकूीचं बोललं असल्याचं श्रीसंत म्हणाला. दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
6… 4… Showdown! Watch till the end for Gambhir 👀 Sreesanth. . .#LegendsOnFanCode @llct20 pic.twitter.com/SDaIw1LXZP
— FanCode (@FanCode) December 6, 2023
Emotions are always running high, when you were very passionate about your game.
Sreesanth and Gambhir in an animated chat during the @llct20 Eliminator!#LegendsLeagueCricket pic.twitter.com/Qjz8LqC41l
— Nikhil 🏏 (@CricCrazyNIKS) December 6, 2023
श्रीसंत व्हिडीओमध्ये काय म्हणाला?
मिस्टर फायटरसोबत नेमकं काय घडलं याबाबत मी खुलासा करत आहे. मिस्टर फायटर विनाकारण त्याच्या सहकाऱ्यांशी भांडत असतो. त्याने वीरेंद्र सेहवागसह संघातील वरिष्ठ खेळाडूंचा आदर केला नाही. तसंच काहीसं झालं, मी काहीही बोललो नसताना गंभीर मला ज्या पद्धतीने बोलता राहिला तसं गंभीरने मला बोलायला नव्हतं पाहिजे, असं श्रीसंतने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, या सामन्यामध्ये इंडिया कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 223-7 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात जायंट्स संघ 20 ओव्हरमध्ये 211-7 धावा करू शकला. या सामन्यात 12 धावांनी इंडिया कॅपिटल्स संघाने विजय मिळवला.