गौतम गंभीरने जाहीर केली विरोधी संघाची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, पाकिस्तानच्या तीन खेळाडूंची नाव

भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर या ना त्या कारणाने चर्चेत असतो. सध्या टीम इंडिया मोठ्या विश्रांतीवर आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी सुरु आहे. असं असताना गौतम गंभीरने विरोधी संघाची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. यात तीन पाकिस्तानची खेळाडूंचा सामावेश आहे.

गौतम गंभीरने जाहीर केली विरोधी संघाची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, पाकिस्तानच्या तीन खेळाडूंची नाव
Follow us
| Updated on: Aug 21, 2024 | 2:33 PM

गौतम गंभीरने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतली आहेत. टी20 मालिकेत त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला घवघवीत यश मिळालं. पण वनडे मालिकेत त्याच्या अगदी उलटं झालं. श्रीलंकेने भारताने वनडे मालिकेत 2-0 ने धोबीपछाड दिला. आता गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. सध्या टीम इंडिया मोठ्या विश्रांतीवर असून बांगलादेशविरुद्धची मालिका 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली पहिलीच कसोटी मालिका आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. दरम्यान, गौतम गंभीरने ऑल टाईम विरोधी संघाची घोषणा केली आहे. गंभीरने जाहीर केलेल्या संघात ऑस्ट्रेलियाचे 3, पाकिस्तानचे 3, दक्षिण अफ्रिकेचे 2, वेस्ट इंडिजचा 1, श्रीलंकेचा 1 आणि इंग्लंडचा एक खेळाडू आहे.

ऑस्ट्रेलियाकडून एडम ग्रिलख्रिस्ट, मॅथ्यू हेड आणि अँड्रयू सायमंड्स यांची नावं आहेत. तर पाकिस्तानकडून इंझमाम उल हक, अब्दुल रज्जाक आणि शोएब अख्तर आहे. दक्षिण अफ्रिकेकडून एबी डिव्हिलियर्स आणि मोर्ने मॉर्केल आहे. तर वेस्ट इंडिकडून ब्रायन लारा, श्रीलंकेकडून मुथय्या मुरलीधरन आणि इंग्लंडकडून अँड्र्यूज फ्लिंटॉप यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विरोधी प्लेइंग 11 मध्ये निवडलेलं एक नाव गौतम गंभीरच्या खूपच जवळचं आहे. मोर्ने मॉर्केल आता गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाफमध्ये आहे आणि टीम इंडियाला गोलंदाजीचं प्रशिक्षण देणार आहे.

ओपनिंगला एडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन, तिसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्स, चौथ्या स्थानावर ब्रायन लारा, पाचव्या स्थानावर अँड्र्यूज सायमंड्स, सहाव्या स्थानावर इंझमाम उल हक, सातव्या स्थानावर अब्दुल रज्जाक, आठव्या स्थानावर मुथय्या मुरलीधरन, नवव्या स्थानावर शोएब अख्तर, दहाव्या स्थानावर मोर्ने मॉर्केल आणि अकराव्या स्थानावर अँड्र्यू फ्लिंटॉप असणार आहे. आता गौतम गंभीरने जाहीर केलेल्या विरोधी संघाच्या प्लेइंग 11 चा भारतीय संघाची कोणती प्लेइंग इलेव्हन सामना करेल हे काय कळलेलं नाही.

विरोधी संघाची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन : एडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, एबी डिव्हिलियर्स, ब्रायन लारा, अँड्रयू सायमंड्स, इंझमाम उल हक, अब्दुल रज्जाक, मुथय्या मुरलीधरन, शोएब अख्तर, मोर्ने मॉर्केल आणि अँड्र्यू फ्लिंटॉप

'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?.
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?.
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.