पान मसाल्याच्या जाहिरातीवरून गौतम गंभीर याची माजी क्रिकेटपटूंवर टीका, म्हणाला; “पैशांसाठी…”

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा त्याच्या रोखठोक अंदाजासाठी ओळखला जातो. आता गौतम गंभीर याच्या निशाण्यावर माजी क्रिकेटपटू आले आहेत. पान मसल्याच्या जाहिरातीवरून त्याने खडे बोल सुनावले आहेत.

पान मसाल्याच्या जाहिरातीवरून गौतम गंभीर याची माजी क्रिकेटपटूंवर टीका, म्हणाला; पैशांसाठी...
पैशांसाठी पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्यांवर गौतम गंभीर कडाडला, स्पष्टच सांगितलं की...
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 4:03 PM

मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर असलेल्या गौतम गंभीरने माजी क्रिकेटपटूंवर टीकास्त्र सोडलं आहे. माऊथ फ्रेशनरच्या नावाखाली पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंना त्याने खडे बोल सुनावले आहेत. तसेच तरुणांनी त्यांचा आदर्श व्यक्ती निवडताना आपली बुद्धी वापरावी असाही सल्ला त्याने दिला आहे. सुनिल गावसकर, विरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल आणि कपिल देव या माजी क्रिकेटपटूंनी पान मसाल्याची जाहिरात करताना दिसत आहेत. त्यामुळे गौतम गंभीरने संताप व्यक्त केला आहे. गंभीरने आरोप करत सांगितलं की, फक्त पैसे कमवणं आपलं ध्येय नसलं पाहीजे. पैसे कमवण्याचे इतर मार्गही आहेत. यासाठी पान मसाल्याचा प्रचार करणं योग्य नाही.

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने सांगितलं की, घृणास्पद आणि निराशाजनक हे दोन शब्द माझ्याकडे आहेत. घृणास्पद कारण मला वाटले नव्हते की एखादा खेळाडू त्याच्या आयुष्यात पान मसाल्याची जाहिरात करेल.निराशाजनक यासाठी कारण मी फक्त एक गोष्ट सांगू शकतो की तुमचा आदर्श निवडताना बुद्धीचा वापर करा. नावापेक्षा काम महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या कामानुसार ओळखले जातात. नावाने नाही.”

“पैसा इतका महत्त्वाचा नाही की, तुम्हाला पान मसाल्याची जाहिरात करावी लागेल. पैसे कमवण्याचे इतरही मार्ग आहेत. तु्म्ही देशातील तरुणांचे रोल मॉडेल आहात. त्यामुळे अशा पद्धतीने पैसे कमवण्यापेक्षा अशा ऑफर धुडकावून लावता आल्या पाहिजेत.”, असंही गौतम गंभीरने पुढे सांगितलं. यावेळी गौतम गंभीरने माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलं.

सचिन तेंडुलकरचं उदाहरण देताना गौतम गंभीर याने सांगितलं की, “त्याला 20-30 कोटी रुपयांची ऑफर आली होती. पण त्याने आपल्या वडिलांना शब्द दिला होता की, तो कधीच तंबाखू आणि पान मसाल्याची जाहिरात किंवा प्रचार करणार नाही. त्यामुळे आजही तो तरुणांचा रोल मॉडेल आहे.”

टी 20 वर्ल्डकप 2007 आणि वनडे वर्ल्डकप 2011 च्या अंतिम फेरीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरने एक आठवण करून देत म्हणाला की, “2018 मध्ये मी जेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी नियुक्त झालो तेव्हा मी तीन कोटी रुपये सोडले होते. खरं तर ते पैसे मिळवू शकलो असतो. पण मी विचार केला की, मी जितकं योगदान दिलं आहे तितकंच मिळायला हवं.”

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.