‘गौतमने ड्रायव्हरची कॉलर पकडली..’ ट्रकवाल्यासोबत गंभीरचं का झालं होतं भांडण?

गौतम गंभीरच्या खांद्यावर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी आहे. त्याच्या प्रशिक्षकापदाखाली टीम इंडिया कसोटीसाठी सराव करत आहे. बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. असं असताना गौतम गंभीरच्या आक्रमक स्वभावाचा एक किस्सा समोर आला आहे. दिल्ली संघातील एका मित्राने हा किस्सा सांगितलं आहे.

'गौतमने ड्रायव्हरची कॉलर पकडली..' ट्रकवाल्यासोबत गंभीरचं का झालं होतं भांडण?
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 3:49 PM

गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच कसोटी मालिकेला सामोरं जाणार आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. असं असताना गौतम गंभीर संदर्भातील एक किस्सा सध्या खूपच चर्चेत आहेत. गौतम गंभीरचा मैदानातील आक्रमक स्वभाव सर्वांनाच माहिती आहे. पण मैदानाबाहेरही गौतम गंभीरने आपला आक्रमक पवित्रा दाखवला आहे. दिल्ली क्रिकेट संघ आणि टीम इंडियात त्याच्यासोबत खेळलेल्या माजी फलंदाज आकाश चोप्राने हा किस्सा सांगितला आहे. एकदा गौतम गंभीरच्या तळपायची आग मस्तकात गेली होती आणि त्याने ट्रक ड्रायव्हरची कॉलर पकडली होती. राज शमानी पॉडकास्टमध्ये आकाश चोप्राने गंभीरच्या आक्रमतेचा हा किस्सा सांगितला. ‘गौतम गंभीर अनेकदा दिल्लीत एका ट्रक ड्रायव्हरसोबत भांडण केल्याचं सांगतो. गंभीरने असं यासाठी केलं होतं की ट्रक ड्रायव्हरने त्याला ओव्हरटेक केलं होतं आणि शिवी घातली होती. त्यानंतर गंभीरने पुढे जाऊन ट्रक थांबवला आणि ट्रकवर चढून ड्रायव्हरची कॉलर पकडली होती.’

आकाश चोप्राने गौतम गंभीरची स्तुती करताना सांगितलं की, त्याच्या याच शैलीमुळे तो एक चांगला खेळाडू आणि तसेच एक चांगला व्यक्ती बनला. दुसरीकडे, दिल्ली संघात स्थान मिळवण्यासाठी आकाश चोप्रा आणि गौतम गंभीर यांच्यात स्पर्धा राहिली आहे. दोघानीही संघात ओपनिंगसाठी दावा ठोकला होता. त्यामुळे दोघांमध्ये दोस्ती कमी आणि स्पर्धाच जास्त होती. आकाश चोप्राने सांगितलं की, गंभीर एका चांगल्या आणि श्रीमंत कुटुंबातून आहे. पण असं असून त्याने खेळाप्रती आपलं प्रेम कायम ठेवलं आणि दिवसभर मैदानात कठोर मेहनत घेतली.

गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली नुकताच श्रीलंका दौरा पार पडला. यात टी20 मध्ये भारताने श्रीलंकेला 3-0 ने पराभूत केलं. तर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने मात खावी लागली. आता बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील कामगिरीवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम फेरीचं गणित असणार आहे. जर बांगलादेशला व्हाईट वॉश देण्यात यश मिळवलं तर पुढची वाट आणखी सोपी होईल.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.