Team India Head Coach: गौतम गंभीर घेणार राहुल द्रविडची जागा! टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड!

Gautam Gambhir Team india Next Head Coach: राहुल द्रविड यांना आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ दिली आहे. मात्र लवकरच त्यांना कालाधवी संपणार आहे.

Team India Head Coach: गौतम गंभीर घेणार राहुल द्रविडची जागा! टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड!
jay shah and gautam gambhirImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 7:35 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमात गौतम गंभीर याने आपल्या मार्गदर्शनात कोलकाता नाईट रायडर्सला तब्बल 10 ट्रॉफी जिंकून दिली. केकेआरने याआधी गंभीरच्या नेतृत्वात 2014 साली आयपीएल ट्रॉफी उंचावली होती. गंभीरने केकेआर टीममध्ये मेंटॉर म्हणून प्रवेश करताच एका झटक्यातच इतिहास रचला. त्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यासाठी 27 मे शेवटची मुदत होती. त्यानंतर आता गौतम गंभीरच हेड कोच असल्याची घोषणा होणं बाकी असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

क्रिकबझच्या एका रिपोर्ट्सनुसार, एका आयपीएल फ्रँचायजीच्या मालकाने गौतम गंभीर हाच टीम इंडियाचा हेड कोच होणार असल्याची माहिती दिली आहे. गंभीरला हेड कोच करण्याबाबत बीसीसीआयची एक बैठक पार पडल्याचंही म्हटलं जात आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाबाबत लवकरच बहुप्रतिक्षित घोषणा केली जाऊ शकते. मात्र अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी 13 मे रोजी मुख्य प्रशिक्षकपदासाठी सोशल मीडियावरुन जाहीरात प्रसिद्ध केली होती. या पदासाठी अर्ज करण्याची 27 मे ही अखेरची तारीख होती. बीसीसीआयने या जाहीरातीसह इच्छुक उमेदवाराला काय अनुभव हवा याबाबतच्या अटी आणि शर्थी ही सांगितल्या होत्या.

काय होत्या अटी आणि शर्थी?

बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अर्जदाराचं वय हे 60 वर्षांपेक्षा जास्त नसावं. इच्छुक उमेदवाराला 30 कसोटी किंवा 50 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव असावा किंवा किमान 2 वर्ष कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पाहिल्याचा अनुभव असावा. इच्छूक उमदेवारांची क्रिकेट सल्लागार समितीकडून मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर मुख्य प्रशिक्षकाचं नाव जाहीर करण्यात येईल. त्यानुसार आता गंभीरचं नाव निश्चित मानलं जात आहे.

गौतम गंभीरला तगडा अनुभव

टीम इंडियाने 2007 साली टी 20 आणि 2011 साली वनडे वर्ल्ड कप जिंकला. गंभीर या दोन्ही वर्ल्ड कप विजेता संघाचा सदस्य होता. गंभीरने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत 147 वनडे सामन्यांमध्ये 5 हजार 238 धावा केल्या आहेत. गंभीरने कसोटी क्रिकेटमधील 58 सामन्यांमध्ये 9 शतकं, 1 द्विशतक आणि 22 अर्धशतकांसह 4 हजार 154 धावा केल्या आहेत. तसेच 37 टी 20 सामन्यांमध्ये गंभीरने 7 अर्धशतकांसह 932 रन्स केल्या आहेत.

Non Stop LIVE Update
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.