बसं झालं..आता कारणं नको! श्रीलंका दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला गौतम गंभीरची तंबी?

टी20 वर्ल्डकप स्पर्धा आणि झिम्बाब्वे दौऱ्यानंतर टीम इंडियात सर्वकाही ठीक चाललं असं वाटत आहे. पण गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर भविष्याच्या दृष्टीने आतापासून पायाभरणी करण्यास सुरुवात केली आहे. रोहित-विराटने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण वनडे मालिकेत खेळावं असा आग्रह गौतम गंभीरने धरल्याची माहिती आहे.

बसं झालं..आता कारणं नको! श्रीलंका दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला गौतम गंभीरची तंबी?
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 1:40 PM

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून यात तीन टी20 आणि 3 वनडे सामने खळणार आहे. या सामन्यांसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. मात्र या मालिकेत दिग्गज खेळाडू खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र प्रशिक्षकपदी बसलेल्या गौतम गंभीर यांना ही बाब रूचलेली नाही, अशी माहिती समोर येत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंना पुरेसा आराम मिळाला आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्मा, विराटसह इतर खेळाडूंचा विचार व्हावा, असं गौतम गंभीरने निवड समितीला सांगितलं आहे. श्रीलंकाविरुद्धची वनडे मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तसेच ही मालिका 7 ऑगस्टला संभणार आहे. त्यानंतर बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेसाठी सहा आठवड्यांचं अंतर आहे. त्यामुळे श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेतून वरिष्ठ खेळाडूंना वगळण्यात अर्थ नाही, असं गौतम गंभीरने सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

श्रीलंकाविरुद्धची मालिका 7 ऑगस्टला संपणार आहे. तर बांग्लादशविरुद्धची मालिका 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मालिकांमध्ये खूप अंतर आहे. त्यामुळे खेळाडूंना पुन्हा आराम मिळणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देणं योग्य वाटत नसल्याचा युक्तिवाद गौतम गंभीरने निवड समितीसमोर केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंची निवड करण्याची मागणी केल्याचं वृत्त आहे. यापूर्वी रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेपासून पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दिग्गज खेळाडू खेळणार की नाही हा प्रश्न आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यात तो टी20 वर्ल्डकप स्पर्धेत असेल. पण वनडे मालिकेसाठी वैयक्तिक कारणामुळे मुकण्याची शक्यता आहे, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बांग्लादेशविरुद्ध हार्दिक पांड्या शेवटचा वनडे सामना खेळला होता. त्यानंतर वनडे सामना खेळलेला नाही. दरम्यान हार्दिक पांड्याने वनडे मालिकेत खेळणार नसल्याचं बीसीसीआयला कळवल्याचं वृत्त आहे.  दरम्यान श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा आज केली जाईल. या संघात कोणा कोणाची निवड होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.