‘येत्या 10 वर्षांमध्ये बाबर आझम हा…’; गौतम गंभीरच्या भविष्यवाणीची पाकिस्तानमध्ये चर्चा
Gautam Gambhir on Babar Azam : वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानच्या कर्णधारपदावकरून बाबर आझम याने राजीनामा दिला होता. बाबर आता फक्त फलंदाज म्हणून संघात असणार आहे. अशातच गौतम गंभीरने मोठी भविष्यवाणी केलीये.
मुंबई : टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर कायम चर्चेच असलेला पाहायला मिळतो. आताच झालेल्या लीजेंड लीगमध्ये गौतम गंभीर आणि श्रीसंत यांच्यात वाद झालेला पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता गंभीरने पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार बाबर आझम याच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतर पाकिस्तान संघाच्या तिन्ही फॉरमॅटमधील क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलेला. याचाच धागा पकडत गौतमने बाबरबाबत एक भविष्यवाणी केली आहे.
काय म्हणाला गौतम गंभीर?
बाबर आझम हा येत्या दहा वर्षांमध्ये पाकिस्तान संघाचा सर्वोत्तम फलंदाज बनू शकतो. कारण आता सर्वांना एक नवीन बाबर पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड कपआधी मी तो वर्ल्ड कपमधील टॉपचा फलंदाज असेल असं म्हटलं होतं. मात्र कर्णधारपदाच्या दबावाचा त्यावर परिणाम झाला. कारण संघाची कामगिरी चांगली होत नसेल तेव्हा कर्णधारावर जास्त दडपणाखाली येतो. आता बाबरवर कोणताही दबाव नसल्याने त्याची खरी क्षमता सर्वांना दिसेल, असं गौतम गंभीर याने म्हटलं आहे.
बाबरकडे इतकी क्षमता आहे की तो येत्या दहा वर्षामध्ये पाकिस्तान संघाचा सर्वोत्तम फलंदाज बनू शकत असल्याचं गंभीर म्हणाला. बाबरने 2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. आतापर्यंत बाबरने त 49 कसोटी, 117 एकदिवसीय आणि 104 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 3772, 5729 आणि 3485 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 32 शतके झळकवली आहेत.
दरम्यान, पाकिस्तान संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या कसोटी सामन्यांमध्ये बाबरच्या फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे. कारण कॅप्टनी सोडल्यावर बाबर याची ही पहिलीच कसोटी मालिका आहे.