Asia Cup जिंकला खरा पण भारताची वर्ल्ड कपआधी कमजोरी आली समोर, गंभीरचं वर्मावर बोट!
Asia Cup 2023 : आशिया कपनंतर आता मिशन वर्ल्ड कपसाठी टीम मॅनेजमेंट ताकद लावताना दिसेल. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपच्या थराराला सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने संघाच्या कमजोरीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : भारतीय संघाने आशिया कप 2023 जिंकत आठव्यांदा विक्रम आपल्या नावावर केलाय. फायनलमध्ये मोहम्मद सिराजने केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे भारतीय संघाने श्रालंकेला अवघ्या 50 धावांवर गुंडाळलं. आशिया कपनंतर आता मिशन वर्ल्ड कपसाठी टीम मॅनेजमेंट ताकद लावताना दिसेल. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपच्या थराराला सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने संघाच्या कमजोरीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाला गौतम गंभीर?
भारताला वर्ल्ड कपमध्ये ताकदीने उतरायचं असेल तर रविंद्र जडेजाने आणखी योगदान देणं गरजेच आहे. जडेजा त्याच्या पूर्ण 10 ओव्हर गोलंदाजी करू शकतो आणि एक कडत फिल्डरसुद्धा आहे पण त्याला सातव्या क्रमांकावर फंलदाजील आल्यावर त्याने धावा काढणं गरजेचं आहे. कारण फक्त सहा फलंदाजांसह संघ मैदानात उतरू शकत नाही, असं रविंद्र जडेजा म्हणाला.
ईशान किशन पाचव्या क्रमांकावर खेळतो, काहीवेळा 10 ओव्हरमध्ये 90 धावांची गरज असेल आणि तेव्हा सहा, सात नंबरचे दोन्ही खेळाडू मैदानात असू शकतात अशी परिस्थिती मैदानात असू शकते त्यामुळ जडेजाने बॅटींग करणं गरजेचं आहे, असंही गौतम गंभीर म्हणाला.
यंदाच्या आशिया कपमध्ये रविंद्र जडेजाची बॅट काही चाललेली दिसली नाही, जडेजाने ती डावांमध्ये फक्त 25 धावा केल्या. जडेजाने चार विकेट्स आणि काही कडक कॅचसुद्धा पकडले. मात्र त्याने फलंदाजी करणं गरजेचं आहे. बांगलादेशविरूद्धचा सामना भारताने अवघ्या 6 धावांनी हरला होता. यामध्ये शुबमन गिल याने शतक केलं होतं मात्र त्याला आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या बाजूने कोणाची साथ मिळाली नाही. जडेजाही त्या सामन्यात लवकरच बाद झाला होता.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आता तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. 22 ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होणार असून त्यानंतर वर्ल्ड कपमध्येही भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत आहे.