World Cup 2023 : टीम इंडियाच्या फायनलमधील पराभवाला हा मोठा खेळाडू जबाबदार, गंभीरच्या वक्तव्याने खळबळ
भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने जर तरची आकडेवारी न सांगता जे काही आहे ते थेट सांगून टाकलं आहे. प्रत्येक भारतीयाच्या हा पराभ जिव्हारी लागलेला आहे. कांगारूंनी आपल्या देशात येत आपल्याला पराभूत करत वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाने दिवाळी खराब झाली. साखळी सामन्यात झकास कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने फायलनमध्ये शरणागती पत्करली. जर असं झालं असतं तर किंवा तसं झालं असतं तर ही सर्व जर तरची गणित बाजूला ठेवा. माजी खेळाडू गौतम गंभीर याने थेट एका खेळाडूचं नाव घेतलं आहे. त्या एका खेळाडूला गंभीरने धारेवर धरलं आहे.
भारताने फायनल सामन्याधी खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये 350 पेक्षा जास्त धावा केलेल्या. फक्त दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यामध्ये भारताने 326 धावा केल्या तेव्हा तब्बल 243 धावांनी विजय मिळवला होता. मात्र फायनल सामन्यात भारताच्या अवघ्या 240 धावा झाल्या. यामधील पहिल्या 10 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावत 80 धावा झाल्या होत्या. मात्र शेवटच्या काही ओव्हरमध्ये भारतीय संघाला याचा फटका बसला.
काय म्हणाला गौतम गंभीर?
गौतम गंभीर याचा के. एल. राहुलवर निशाणा होता. विराट आणि राहुल यांनी 109 बॉलमअध्ये 67 धावा केल्या होत्या. यामधील विराटने 63 बॉलमध्ये 54 धावा करत स्ट्राईक रेट चांगला ठेवला होता मात्र के. एल. राहुल याने संपूर्ण डावात अवघा एक चौकार मारला होता. विराटने डाव सांभाळला होता मात्र के.एल. ने धावांसाठी रिस्क घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. आता हा काही 1990 नाही की 240 धावांचा तुम्ही बचाव करू शकता, असं म्हणत गंभीरने उघडपणे राहुलचं नाव घेत जडेजावरही निशाणा साधला.
फायनल सामन्याचा धावता आढावा
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या फायनल सामन्यात कांगारूंनी टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. भारताला पहिल्यांदा फलंदाज करताना मोठ्या धावसंख्येपर्यं काही मजल मारता आली नाही. भारतीय संघ 240 धावांवर ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलिया संघाने या लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्या 4 विकेट गमावत 6 विकेटने फायनल जिंकली. कांगारूंच्या ट्राविस हेड याने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला.