राम मंदिराच्या उद्घाटनाला तुला बोलावलं की नाही? नेटकऱ्याच्या प्रश्नावर गंभीर म्हणाला…
Gautam Gambhir Ayodhya : टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याला एका नेटकऱ्याने अयोध्येला राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार का असा सवाल केला. यावर गंभीर काय म्हणाला जाणून घ्या.
मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन नव वर्षातील 22 जानेवारीला होणार आहे. या उदघाटनाला आमंत्रण न दिल्याने राजकारण तापलेलं दिसत आहे. सरकारकडून आमंत्रण न गेल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली होती. राज्यातील बड्या नेत्यांना आता आमंत्रण दिलं आहे मात्र यावरून चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. राम मंदिराच्या उद्घाटनाची सर्वत्र चर्चा असताना टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याला नेटकऱ्याने राम मंदिराच्या उद्घाटना जाणार आहे की नाही विचारलं. यावर गौतमने पाहा काय उत्तर दिलं आहे.
काय म्हणाला गौतम गंभीर?
ट्विटवर गौतम गंभीर याला एका नेटकऱ्याने विचारलं की, शेकडो वर्षांनंतर अयोध्येत राम मंदिर बांधलं जाणार आहे. तू मंदिराच्या उद्घाटनाला जाणार आहेस की नाही? यावर उत्तर देताना, ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन, यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो.
बिलकुल जायेंगे. पूरे देश के लिए गौरव की बात है. I congratulate everyone involved & thank Hon’ble PM for this. https://t.co/sr4Arr80iS
— Gautam Gambhir (@GautamGambhir) December 29, 2023
गौतम गंभीरने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीसुद्धा तो कायम चर्चेत असलेला पाहायला मिळतो. गंभीरची कायम कोणती ना कोणती वक्तव्ये चर्चेत असतात. यावरून गंभीरवरही मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते. यावर उत्तर देताना, मला जे वाटतं ते मी सांगतो. या वादातून कोणाचा फायदा होतो याचा विचार करा, असं गंभीर म्हणाला.
दरम्यान, गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्यामध्ये लिजेंड लीगमध्ये वाद झाला होता. त्यावेळी फिक्सर फिक्सर असं गंभीरने त्याला म्हटलं असल्याचा आरोप श्रीसंतने केला होता.