गावस्करांचा हटके डान्स, पाहा व्हिडीओ
टीम इंडियाच्या विजयानंतर गावस्करांनी असा काही डान्स केलाय. की एकदा व्हिडीओ पहाच......
नवी दिल्ली : भारताने ऑस्ट्रेलियाचा (IND vs AUS) तिसरा आणि अखेरचा सामना रविवारी हैदराबादमध्ये जिंकला. तिसऱ्या सामन्यात सहा गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची T20I मालिका जिंकली. या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत 186 धावा केल्या. विराट कोहली आणि सूर्यकुमारच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं (Team India) पहिल्या चेंडूवर चार गडी गमावून लक्ष्य गाठले होते. या सामन्यात कोहलीने 63 धावा केल्या होत्या. त्याचवेळी सूर्यकुमारने 69 धावा केल्या. यावेळी सुनील गावस्करांचा (Sunil Gavaskar) एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.
शोमध्ये गावस्करांचा डान्स
सामन्यानंतर गावस्कर हे स्टार स्पोर्ट्सवरील पोस्ट मॅच शोमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनशी चर्चा करत होते. लाइव्ह शो सुरू होता आणि गावस्करांनी आनंद व्यक्त केला. लाइव्ह शोमध्ये ते नाचू लागले.
हा व्हिडीओ पाहा
— Bleh (@rishabh2209420) September 26, 2022
सामन्यात विराट कोहली आपल्या ओळखीच्या स्टाईलमध्ये दिसला. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना झोडपून काढले आणि सतत धावा काढल्या. कोहलीनं 63 धावांची खेळी खेळली आणि सूर्यकुमारसोबत तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली.
सूर्यकुमार मात्र अधिक आक्रमक दिसला. त्यानं 36 चेंडूत 69 धावा केल्या. सूर्यकुमार मैदानावर असताना कोहली शांत होता पण तो आऊट होताच कोहली पुन्हा आक्रमक झाला. ऑस्ट्रेलियानं भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कोहलीने षटकार मारला आणि पुढच्या चेंडूवर तो बाद झाला. पण हार्दिक पांड्याने पाचव्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला आणि भारताने मालिका 2-1 अशी जिंकली.
ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघाच्या नजरा 28 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेवर आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी ही मालिका सरावाची चांगली संधी आहे.