84 धावांवर गुंडाळला कांगारुंचा डाव, 8 विकेट्स घेत ‘या’ गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाची उडवली दाणादाण

इंग्लंडच्या जॉर्ज लोहमॅन (george lohmann) यांनी आजच्याच दिवशी 1887 मध्ये आजच्या दिवशीच ही कामगिरी केली होती.

84 धावांवर गुंडाळला कांगारुंचा डाव, 8 विकेट्स घेत 'या' गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाची उडवली दाणादाण
इंग्लंडच्या जॉर्ज लोहमॅन यांनी आजच्याच दिवशी 1887 मध्ये आजच्या दिवशीच ही कामगिरी केली होती.
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 10:59 AM

सिडनी : क्रिकेट (cricket) अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. साधारणपणे क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात (टेस्ट, एकदिवसीय आणि टी 20) 84 धावांवर ऑलआऊट होणं हे लाजीरवाणं समजलं जातं. काही वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी तगड्या समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियावर त्यांच्याच घरच्या मैदानावर ही नामुष्की ओढावली होती. कांगारुंचा डाव अवघ्या 84 धावांवर आटोपला होता. हा सारा प्रकार सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी 26 फेब्रुवारीला घडला होता. इंग्लंडच्या जॉर्ज लोहमॅनने (George Lohmann) कांगारुंच्या 8 फलंदाजांना बाद करण्याचा कारनामा केला होता. हा सामना लो स्कोरिंग राहिला होता.या टेस्टमध्ये दोन्ही संघांना 160 धावांचा आकडाही पार करता आला नाही. (george lohmann all out to australia on 84 runs at syedney cricket ground test match on this day)

नक्की प्रकरण काय?

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 25 फेब्रुवारी 1887 ला कसोटी सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाहुण्या इंग्लंडने पहिल्या डावात 109 ओव्हरमध्ये एकूण 151 धावा केल्या. इंग्लंडकडून विल्फ फ्लॉवर्सने सर्वाधिक 37 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून जेजे फेरिस आणि चार्ली टर्नरने प्रत्येकी 5 विकेट्स घेतल्या.

आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 84 धावांवर ढेपाळली

पहिल्या डावात इंग्लंडला 151 धावांवर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या उभारण्याच्या इच्छेने मैदानात आली. पण ऑस्ट्रेलियाचा भ्रमनिरास झाला. इंग्लंडच्या जॉर्ज लोहमॅनने कांगारुंना एकावर एक झटके दिले. यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 55.1 Overs मध्ये 84 धावांवर आटोपला. लोहमॅनने 27.1 ओव्हर्सपैकी 12 निर्धाव षटकं टाकली. यात त्यांनी 35 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स झटकल्या. तर विल्फनेही 2 फलंदाजांना माघारी पाठवत लोहमॅनला चांगली साथ दिली.

ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 84 धावांवर गुंडाळल्याने इंग्लंडला दुसऱ्या डावात 67 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडने एकूण 140.1 ओव्हर्समध्ये सर्वबाद 154 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 222 धावांचे आव्हान मिळाले.

इंग्लंडचा 71 धावांनी विजय

222 या विजयी आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी यजमान ऑस्ट्रेलिया मैदानात आली. पण ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात विजयी आव्हान पार करण्यात यश आले नाही. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 151 धावांवर आटोपला. यामुळे इंग्लंडचा 71 धावांनी विजय झाला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेत एकूण सामन्यात 10 विकेट्स पूर्ण केल्या. तर बिली बेट्सने 4 बळी घेतल्या. सोबतच जॉनी ब्रिग्सने 3 फलंदाजांमा माघारी पाठवलं. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात कर्णधार पर्सी मॅक्डोलने 35 धावांनी खेळी केली.

संबंधित बातम्या :

आधी टीम इंडियात निवड, आता रोहित शर्माच्या फेव्हरेट खेळाडूचं वादळ, 58 चेंडूत 133 धावा

Axar Patel | ना जलेबी, ना फाफडा, अक्षर पटेल आपडा, लोकल बॉय अक्षरला 11 विकेट

(george lohmann all out to australia on 84 runs at syedney cricket ground test match on this day)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.