Glenn Maxwell IPL 2021 RCB Team Player : आंतरराष्ट्रीय T-20 मधल्या हिरोचा आयपीएलमध्ये फ्लॉप शो, तरीही कोट्यवधींची बोली
किंग्ज इलेव्हन पंजाबने (KXIP) संघातून मुक्त केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलवर (Glenn Maxwell) यंदादेखील तगडी बोली लागली.
मुंबई : किंग्ज इलेव्हन पंजाबने (KXIP) संघातून मुक्त केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलवर (Glenn Maxwell) यंदादेखील तगडी बोली लागली. मॅक्सवेलला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. अखेर विराट कोहलीच्या बंगळुरुने तब्बल 14.25 कोटी रुपयांची बोली लावून ग्लेन मॅक्स्वेलला आपल्या ताफ्यात घेतलं. मॅक्सवेलची बेस प्राईज 2 कोटी रुपये इतकी होती. मॅक्सवेलला 2020 मध्ये पंजाबने 10 कोटी 75 लाखांमध्ये आपल्या संघात घेतलं होतं. त्याआधीच्या आयपीएलमध्येदेखील मॅक्वलेलवर 10 कोटी किंवा त्याहून अधिक बोली लागली आहे. आयपीएलमधून कोट्यवधी रुपये कमावणारा मॅक्सवेल त्याच्या नावाला साजेसं प्रदर्शन अद्याप करु शकलेला नाही. क्रिकेट रसिक अजूनही मॅक्सवेलचा जलवा पाहण्यासाठी उत्सूक आहेत. (Glenn Maxwell IPL 2021 RCB Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos Indian Cricket Players Latest News in Marathi)
मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
ग्लेन मॅक्सवेलने 25 ऑगस्ट 2012 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. शारजाह क्रिकेट ग्राऊंडवर अफगाणिस्तानविरुद्ध खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्याद्वारे त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटचा श्रीगणेशा केला. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 116 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधीत्त्व केलं आहे. यापैकी 106 डावांमध्ये त्याने 34.36 च्या सरासरीने आणि 125.44 च्या स्ट्राईक रेटने त्याने 3230 धावा जमवल्या आहेत. यात 2 शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे.
फॉरमॅट
|
सामने
|
डाव
|
नाबाद
|
धावा
|
हायस्कोर
|
सरासरी
|
चेंडू
|
चेंडू
|
स्ट्राईक रेट
|
शतकं
|
अर्धशतकं
|
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी
2013–17
|
7
|
14
|
1
|
339
|
104
|
26.1
|
570
|
185
|
59.5
|
1
|
0
|
एकदिवसीय
2012–
|
116
|
106
|
12
|
3230
|
108
|
34.4
|
2575
|
90
|
125.4
|
2
|
22
|
T20
2012–
|
72
|
65
|
9
|
1780
|
145*
|
31.8
|
1120
|
65
|
158.9
|
3
|
9
|
टी-20 क्रिकेटमधला हिरो
सप्टेंबर 2012 मध्ये मॅक्सवेलने टी-20 डेब्यू केला. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 72 टी-20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यापैकी 65 डावात फलंदाजी करताना त्याने 31.80 च्या सरासरीने आणि 158.93 च्या तगड्या स्ट्राईक रेटने 1780 धावा फटकावल्या आहेत. यात त्याच्या 3 शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला फारशी संधी मिळालेली नाही. आतापर्यंत 7 कसोटी सामन्यांमध्ये त्याने एका शतकाच्या मदतीने त्याने 339 धावा जमवल्या आहेत.
आयपीएलमध्ये फ्लॉप शो
मॅक्सवेल 2012 पासून आयपीएल खेळतोय परंतू आतापर्यंत केवळ 2014 च्या सत्रात त्याने त्याच्या नावाला साजेशी कामगिरी केली होती. 2014 च्या मोसमात मॅक्सवेलने 16 सामन्यांमध्ये 552 धावा फटकावल्या होत्या. तर आयपीएल 2017 मध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 310 धावा जमवल्या होत्या. आयपीएलच्या उर्वरीत 6 मोसमांपैकी (मॅक्सवेल सहभागी असलेल्या) एकाही स्पर्धेत त्याने 200 पेक्षा जास्त धावा फटकावल्या नाहीत. त्यामुळे आयपीएलमधल्या या फ्लॉप खेळाडूवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांची बोली का लावली जाते? असा सवाल नेहमीच उपस्थित केला जातो. तर या प्रश्नाचं एकमेव उत्तर आहे, ते म्हणजे मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरी. त्यातही प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये तो सातत्याने धावा फटकावतोय. त्यामुळेच तो आयपीएलमध्येदेखील चांगली कामगिरी करु शकेल, याच आशेवर फ्रेंचायझी त्याच्यावर कोट्यवधी रुपयांची बोली लावत असतील.
आयपीेलमधील फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील कामगिरी
सामने | नाबाद | धावा | हायस्कोर | सरासरी | चेंडू | SR | 100 | 50 | 4s | 6s | CT | ST | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
IPL कारकीर्द | 82 | 11 | 1505 | 95 | 22.13 | 973 | 154.67 | 0 | 6 | 118 | 91 | 30 | 0 |
2020 | 13 | 4 | 108 | 32 | 15.42 | 106 | 101.88 | 0 | 0 | 9 | 0 | 4 | 0 |
2018 | 12 | 0 | 169 | 47 | 14.08 | 120 | 140.83 | 0 | 0 | 14 | 9 | 4 | 0 |
2017 | 14 | 3 | 310 | 47 | 31.00 | 179 | 173.18 | 0 | 0 | 19 | 26 | 7 | 0 |
2016 | 11 | 2 | 179 | 68 | 19.88 | 124 | 144.35 | 0 | 2 | 14 | 8 | 3 | 0 |
2015 | 11 | 0 | 145 | 43 | 13.18 | 112 | 129.46 | 0 | 0 | 13 | 8 | 2 | 0 |
2014 | 16 | 0 | 552 | 95 | 34.50 | 294 | 187.75 | 0 | 4 | 48 | 36 | 9 | 0 |
2013 | 3 | 1 | 36 | 23 | 18.00 | 27 | 133.33 | 0 | 0 | 1 | 4 | 1 | 0 |
2012 | 2 | 1 | 6 | 3* | 6.00 | 11 | 54.54 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 |
गोलंदाजीतही उत्तम
मॅक्सवेल एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो एक ऑफ स्पिन (फिरकीपटू) गोलंदाज आहे. एकदिवसीय सामन्यांच्या 91 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 51 बळी मिळवले आहेत. 46 धावांवर 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टी-20 क्रिकेटच्या 47 डावांमध्ये त्याने गोलंदाजी केली आहे. त्यात त्याने 31 बळी मिळवले आहेत. 10 धावांवर 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. परंतु हाच मॅक्सवेल आयपीएलमध्ये गोलंदाजीत फारशी चमक दाखवू शकलेला नाही. आयपीएलच्या 82 सामन्यांपैकी 50 डावांनध्ये गोलंदाजी करताना त्याने केवळ 19 बळी मिळवले आहेत. आयपीएलमध्ये जसा तो फलंदाजीत अपयशी ठरला आहे, तसाच गोलंदाजीतही फारसा प्रभावी ठरलेला नाही.
फॉरमॅट
|
सामने
|
डाव
|
चेंडू
|
निर्धाव
षटकं
|
धावा
|
बळी
|
सर्वोत्तम
गोलंदाजी
|
इकोनॉमी
|
सरासरी
|
स्ट्राईक
रेट
|
4W
|
5W
|
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी
2013–17
|
7
|
9
|
462
|
4
|
341
|
8
|
4/127
|
4.42
|
42.6
|
57.8
|
1
|
0
|
एकदिवसीय
2012–
|
116
|
91
|
2840
|
9
|
2683
|
51
|
4/46
|
5.66
|
52.6
|
55.7
|
2
|
0
|
T20
2012–
|
72
|
47
|
648
|
0
|
811
|
31
|
3/10
|
7.50
|
26.2
|
20.9
|
0
|
0
|
IPL
2012–
|
82
|
50
|
546
|
0
|
780
|
19
|
2/15
|
8.57
|
41.0
|
28.7
|
0
|
0
|
इतर बातम्या
Virat Kohli IPL 2021 RCB Team Player : रनमशीन विराट कोहली आयपीएलमध्येही अव्वल
(Glenn Maxwell IPL 2021 RCB Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos Indian Cricket Players Latest News in Marathi)