Glenn McGrath च्या घरात सापडला भलामोठा अजगर, व्हिडीओ तुफान व्हायरल!

Glenn McGrath Video With Python : एका दिग्गज क्रिकेटपटूच्या घरात चक्क भलामोठा अजगर निघाला होता. भल्लभल्यांच्या दांड्या उडवणारा हा खेळाडू घाबरला नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Glenn McGrath च्या घरात सापडला भलामोठा अजगर, व्हिडीओ तुफान व्हायरल!
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 12:27 AM

मुंबई : घरात कधी साप निघाली की अनेकांची पळताभुई होते, त्यात जर तो साप अजगर असेल तर विषयच संपला. अजगर म्हटलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका दिग्गज क्रिकेटपटूच्या घरात चक्क भलामोठा अजगर निघाला होता. भल्लभल्यांच्या दांड्या उडवणारा हा खेळाडू घाबरला नाही. त्याने घरातील फरशी साफ करणाऱ्या पोछाच्या मदतीने अजगराला पकडलं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ-

कोण आहे तो जिगरबाज खेळाडू-

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा संघाचा माजी खेळाडू ग्लेन मॅकग्रा आहे. मॅकग्रा यांनी स्वत: हा व्हिडीओ आपल्या इन्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, घरात असलेल्या अजगराला मॅकग्रा पोछाने पकडताना दिसत आहेत. मॅकग्राच्या घरचे अजगराला पाहून प्रचंड घाबरले होते.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडूंमध्ये ग्लेन मॅकग्रा याचा समावेश होतो. मॅकग्राने कसोटीमध्ये 124 सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 563 विकेट्स घेतल्या होत्या. तर 250 वन डे सामन्यांमध्ये 381 विकेट्स घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतली होती. ग्लेन मॅकग्रा याच्या पहिल्या पत्नीचं 2008 मध्ये पहिल्या पत्नीचं कर्करोगामुळे निधन झालं होतं. त्यानंतर आयपीएलमध्ये 2009 मध्ये त्याची सारा लिओनार्डी याच्यासोबत ओळख झाली होती, त्यानंतर दोघांनी 2010 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, ग्लेन मॅकग्रा यांच्यानावावर अनेक रेकॉर्ड असून ऑस्ट्रेलियासाठी अनेक सामने एकहाती फिरवलेत. मॅकग्रा यांचा अजगर पकडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.