Afridi Hat Trick | आफ्रिदीचा बॉलिंगने कहर, हॅटट्रिकसह 5 विकेट्स, व्हीडिओ व्हायरल

Abbas Afridi Hat Trick | आफ्रिदीने आपल्या धारधार बॉलिंगने प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध हॅटट्रिक घेतली. या हॅटट्रिकचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Afridi Hat Trick | आफ्रिदीचा बॉलिंगने कहर, हॅटट्रिकसह 5 विकेट्स, व्हीडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 6:48 PM

कॅनडा | कॅनडात सध्या ग्लोबल टी 20 लीग क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. या टी 20 लीगमध्ये पाकिस्तानच्या आफ्रिदीने धुमशान घातलंय. आफ्रिदीने हॅटट्रिकसह 5 विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाला झटक्यात बॅकफुटवर ढकललं. व्हँकुव्हर नाइट्स विरुद्ध मॉन्ट्रियल टायगर्स यांच्यात 5 ऑगस्ट रोजी क्वालिफायर 2 सामना खेळवण्यात आला. या आरपारच्या सामन्यात आफ्रिदीने ही चमकदार कामगिरी केली.

मॉन्ट्रियल टायगर्सकडून खेळताना 22 वर्षीय अब्बास आफ्रिदीने हॅटट्रिकसह 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. मॉन्ट्रियल टायगर्सने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. अब्बासच्या भेदक माऱ्यासमोर व्हँकुव्हर नाइट्स टीमला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 137 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात मॉन्ट्रियल टायगर्सने 3 बॉलआधी 1 विकेटने सामना जिंकला आणि फायनलमध्ये धडक मारली.

अब्बास आफ्रिदी याचा 13 व्या ओव्हरमध्ये कारनामा

अब्बास आफ्रिदी याने व्हँकुव्हर नाइट्सच्या डावातील 13 व्या ओव्हरमध्ये हॅटट्रिक घेत सामना पलटवला. अब्बासने या 13 व्या ओव्हरमधील शेवटच्या 3 बॉलवर विकेट्स घेत हॅटट्रिक पूर्ण केली. अब्बासने व्हँकुव्हर नाइट्स टीमच्या कॉर्बिन बॉश, कॅप्टन सी व्हॅन डर डुसेन आणि नजीबुल्ला झद्रान या तिघांना आऊट करत हॅटट्रिक घेतली. त्यामुळे व्हँकुव्हर नाइट्स टीमची 2 बाद 90 वरुन 5 बाद 90 अशी स्थिती झाली.

अब्बास आफ्रिदी हॅटट्रिक

अब्बासने घेतलेल्या या हॅटट्रिकमुळे व्हँकुव्हर नाइट्सचा डाव गडगडला. व्हँकुव्हर नाइट्सला त्यानंतर पुढील 7 ओव्हरमध्ये फक्त 47 धावाच करता आल्या. त्यामुळे व्हँकुवरने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 137 धावा केल्या. अब्बासने 4 ओव्हर्सच्या स्पेलमध्ये 7.20 च्या इकॉनॉमी रेटने 29 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

व्हँकुव्हर नाइट्स प्लेईंग इलेव्हन | रॅसी व्हॅन डर डुसेन (कॅप्टन), रेयान पठाण, मोहम्मद रिझवान, कॉर्बिन बॉश, वृत्य अरविंद, हर्ष ठाकर, नजीबुल्ला झद्रान, फॅबियन ऍलन, रविंदरपाल सिंग, रुबेन ट्रम्पेलमन आणि जुनैद सिद्दिकी.

मॉन्ट्रियल टायगर्स प्लेईंग इलेव्हन | ख्रिस लिन (कर्णधार), मुहम्मद वसीम, श्रीमंथा विजेरत्ने (विकेटकीपर), दीपेंद्र सिंग आयरी, शेरफेन रदरफोर्ड, दिलप्रीत सिंग, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रॅथवेट, कलीम सना, अयान अफजल खान आणि अब्बास आफ्रिदी.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.