वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आयसीसीकडून टीम इंडियाला आनंदाची बातमी, 2 खेळाडूंना लॉटरी
टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरत आपल्यावरील चोकर्सचा डाग लागू दिला नाही. भारतीय चाहत्यांनी दमदार स्वागत करत खेळाडूंना त्यांनी काय केलंय हे आपल्या उपस्थितीने दाखवून दिलं. अशातच दोन खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आली आहे.
वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियाचं मायदेशी जंगी स्वागत करण्यात आलं. समुद्राच्या बाजूला चाहत्यांनी आपल्या उपस्थितीने महासागर उभा केला होता. वानखेडे स्टेडियमपर्यंत जाताना चाहते आणि टीममधील खेळाडू सर्वांनी विजयी रॅलीमध्ये आनंद घेतला. भारताच्या चाहत्यांना आयसीसीच्या ट्रॉफीसाठी 11 वर्षे वाट पाहावी लागली होती. अखेर भारताच्या चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली असून असून आता भारताकडेही आयसीसी ट्रॉफी आली आहे. टीम इंडियाचं कशा प्रकारे स्वागत झालं हे संपूर्ण जगाने आता पाहिलं असेल. टीम इंडियाचा एकदा नाहीतर दोनवेळा तोंडचा घास पळवल्यासारखं झालं होतं. मात्र रोहित अँड कंपनीने टी-20 वर्ल्ड कपसारखी नामी संधी गमावली नाही. अशातच आयसीसीनेही एक आनंदाची बातमी दिली आहे.
आयसीसीने मोठी घोषणा केली असून या पुरस्कारासाठी दोन खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. आयसीसीने ‘प्लेयर ऑफ द मंथ’ साठी टीम इंडियाचे दोन आणि अफगाणिस्तान संघातील एका खेळाडूची निवड केलीये. यातील भारताचे ते दोन खेळाडू म्हणजे यॉर्कर किंग ओळखला जाणार जसप्रीत बुमराह आहे. तर दुसरा खेळाडू म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा असून तिसरा खेळाडू रहमानउल्ला गुरबाज आहे.
आयसीसीने या तिघांची निवड करण्यामागे त्या दर्जाची कामगिरी या तिन्ही मागील महिन्यातील खेळाडूंनी केलीये. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा रहमानउल्ला गुरबाज याने केल्या आहेत. गुरबाजने 8 सामन्यात 35.12 च्या सरासरीने आणि 124.33 च्या स्ट्राइक रेटने एकूण 281 धावा केल्या. त्यापाठोपाठ टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा असून त्याने सर्वाधिक करण्याच्या यादीमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
After impressive campaigns at the #T20WorldCup 2024, Jasprit Bumrah, Rohit Sharma and Rahmanullah Gurbaz have been nominated for the coveted Men’s Player of the Month award 🏅
Details 👉 https://t.co/bTvlIPpKI2 pic.twitter.com/A1tCzww2cf
— ICC (@ICC) July 4, 2024
रोहितने 36.71 सरासरी तर 156.7 स्ट्राइक रेटने 257 धावा केल्या. सुपर-८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 92 धावांची खेळी केली होती, तर उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 57 धावांची खेळी केली होती. त्यामुळे टीम इंडियाचा जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला. तिसरा खेळाडू म्हणजे जसप्रीत बुमराह आहे. टीम इंडियाकडून गोलंदाजीमध्ये सर्वात आव्हानात्मक गोलंदाज बुमराह राहिला आहे. बुमराहने 8.26 च्या सरासरीने एकूण 15 विकेट घेतल्या आणि संपूर्ण स्पर्धेत 4.17 च्या इकॉनॉमी रेटने धावा केल्या. यामधील कोणत्या खेळाडूची निवड होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.