GT vs CSK 2023 : उद्या मॅच अन् चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा झटका, धोनीच्या हुकमी एक्क्याबाबत मोठी बातमी समोर
आयपीएलच्या 16 व्या पर्वाला उद्यापासून सुरूवात होत आहे. पहिलाच सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये होणार आहे. मात्र त्याआधी चेन्नई संघाला मोठा झटका बसला आहे.
मुंबई : आयपीएलच्या 16 व्या पर्वाला उद्यापासून सुरूवात होत आहे. पहिलाच सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये होणार आहे. मात्र त्याआधी चेन्नई संघाला मोठा झटका बसला आहे. कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना चेन्नईने चारवेळा किताबावर नाव कोरलं आहे. मात्र संघाला पहिला सामना होण्याआधीच मोठा झटका बसला आहे.
लीगमधील सर्वात वयाने जास्त असलेले खेळाडू सीएसकेच्या संघामध्ये पाहायला मिळतात त्यासोबतच तरूण खेळाडूही असतात. यामधीलच एक मोठं नाव म्हणजे दीपक चहर. ज्याने चेन्नईची गोलंदाजीचा कमान सांभाळली होती मात्र दुखापतीमुळे मागील सीझनमध्ये तो बाहेर झाला आणि त्याजागी माहीने युवा गोलंदाजाकडे ही जबाबदारी दिली होती. त्यानेसुद्धा माहीने दिलेल्या संधीचं सोन करत छाप पाडली होती आणि सीएसकेचा स्ट्राईक बॉलर म्हणून उदयाला आला. हाच खेळाडू आता यंदाच्या पर्वामधून बाहेर पडला आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मुकेश चौधरी आहे. स्पर्धेला सुरूवात होण्याआधी संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 2022 साली दीपक चहरच्या जागी संधी मिळाल्यावर त्याने 13 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या होत्या. मागील सीझनमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीमध्ये मुकेशने जागा मिळवली होती. मुकेशच्या जागी कोणाला संघ रिप्लेस करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघ:
डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, बेन स्टोक्स, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, सिमरजीत सिंग, अजिंक्य रहाणे, शुभ्रांशू सेनापती, शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, भगत वर्मा, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, अजय जाधव मंडल, मथीशा पाथीराना, महेश थेक्षाना, प्रशांत सोळंकी, सिसंदा मगला
गुजरात टायटन्स संघ:
अभिनव मनोहर, शुभमन गिल, केन विल्यमसन, हार्दिक पंड्या (C), राहुल तेवाटिया, मॅथ्यू वेड (WK), रशीद खान, शिवम मावी, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, यश दयाल, श्रीकर भारत, रिद्धिमान साहा, डेव्हिड मिलर, साई सुदर्शन, उर्विल पटेल, विजय शंकर, रविश्रीनिवासन साई किशोर, ओडियन स्मिथ, जयंत यादव, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, नूर अहमद, मोहित शर्मा, प्रदीप सांगवान