मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी सावध सुरुवात केली. आयपीएल 2023 स्पर्धेत शुभमन गिल चांगलाच फॉर्मात आहे. त्यामुळे त्याला बाद करण्याचं मोठं आव्हान चेन्नई सुपर किंग्ससमोर आहे. यासाठी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने शुभमन गिलसाठी तसंच क्षेत्ररक्षणाचं जाळं रचलं आहे. पण मुंबई इंडियन्सने जी चूक केली तीच चूक चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यात पाहायला मिळाली.
तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर शुभमन गिलला बाद करण्याची संधी आली आली होती. पण दीपक चाहरने झेल सोडून शुभमन गिलला जीवनदान दिलं. शुभमन गिल झेल सोडला तेव्हा त्याने 5 चेंडूत 4 धावा केल्या होत्या. आता दीपक चाहरची एक चूक चांगलीच भोवणार असंच दिसतंय.
तुषार देशपांडेकडे महेंद्र सिंह धोनीने चौथं षटक सोपवलं. या षटकात शुभमन गिलने चांगलाच इंगा दाखवला. पहिल्या तीन चेंडूवर सलग तीन चौकार ठोकले. यामुळे शुभमन गिलला एक जीवनदान देणं खूप महागात पडेल असंच म्हणावं लागेल.
पाचवं षटक महेंद्रसिंह धोनीने दीपक चाहरला सोपवलं. स्वत:च्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर त्याने झेल सोडला. यावेळी समोर वृद्धिमान साहा होता. हा झेल कठीण असला तरी महत्त्वाचा होता.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा