GT vs CSK IPL Qualifier 2023 : ऋतुराज गायकवाड कॅच आऊट झाला आणि त्याच चेंडूवर ठोकला षटकार, कसं काय

आयपीएल 2023 स्पर्धेतील महत्त्वपूर्ण क्वॉलिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने जबरदस्त कामगिरी केली. पण एक चेंडू असा आला की...

GT vs CSK IPL Qualifier 2023 : ऋतुराज गायकवाड कॅच आऊट झाला आणि त्याच चेंडूवर ठोकला षटकार, कसं काय
GT vs CSK IPL Qualifier 2023 : ऋतुराज एका बॉलवर आऊट आणि तेव्हाच मारला षटकार, कसं शक्य आहे?Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 9:21 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिला क्वॉलिफायर सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात गुजरातने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि चेन्नईला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. वेगवान गोलंदाज दर्शन नलकांडेच्या दुसऱ्या षटकात जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कॉनवेनं एक धाव घेत ऋतुराजला स्ट्राईक दिली. पुढचा चेंडू निर्धाव गेला आणि तिसऱ्या चेंडूवर वेगळंच काहीसं घडलं.

नलकांडेच्या तिसऱ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडने मिडविकेटजवळ शॉट मारला. तिथे फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या गिलने त्याचा झेल घेताल. नलकांडे, गिल आणि कर्णधार हार्दिक पांड्या जल्लोष करू लागले. मात्र एका क्षणात त्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजले. कारण ज्या चेंडूवर ऋतुराज बाद झाला तो चेंडू नो होता. चेंडू टाकताना नलकांडेने रेषेपार पाय टाकला होता.

ऋतुराज गायकवाडने जीवनदानाचा जबरदस्त फायदा करून घेतला. फ्री हिटवर मिड ऑनवरून ड्रेसिंग रुमजवळ षटकार ठोकला. नलकांडेच्या एकाच चेंडूवर झेलबाद आणि त्याच चेंडूवर षटकार असं समीकरण जुळून आलं. त्यानंतर ऋतुराज गायकवाडची बॅट चांगलीच तळपली. 44 चेंडूत 60 धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 7 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासटी 173 धावांचं आव्हान दिलं आहे.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, दर्शन नलकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश थेक्षाना.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.