Vijay Shankar | अभ्यास शुबमन गिलचा पेपर आला शंकरचा, विजयने कोलकाताला फोड फोड फोडला
विजय शंकर याची कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात कॅप्टन हार्दिक पंड्या याच्या जागेवर गुजरात टायटन्स टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
अहमदाबाद | आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 13 वा सामना हा गुजरात जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. गुजरातने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. हा बॅटिंगचा निर्णय गुजरातच्या फलंदाजांनी योग्य ठरवा. प्रकृती स्थिर नसल्याने या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याला मुकावं लागंल. हार्दिकच्या जागी विजय शंकर याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. टीम मॅनेजमेंटने मोठ्या विश्वासाने शंकरला संधी दिली. विजय शंकर टीम मॅनेजमेंटच्या विश्वासावर खरा उतरला. शंकरने वादळी अर्धशतक ठोकत मोठा कारनामा केला.
गुजरातच्या शुबमन गिल आणि ऋद्धीमान साहा या सलामी जोडीने 33 धावांची सलामी भागीदारी केली. साहा 17 धावांवर बाद झाला. त्यानंतर शुबमन आणि सा सुदर्शन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अभिनव मनोहर मैदानात आला. अभिनवसोबत सुदर्शनने धावफलक हलता ठेवला. मात्र तिसऱ्या विकेटसाठी 18 धावा जोडल्यानंतर अभिनव मनोहर 14 रन्स करुन माघारी परतला.
त्यानंतर विजय शंकर मैदानात आला. या दरम्यान साई सुदर्शनने फटेकबाजी सुरुच ठेवली होती. साई मैदानात चौफेर फटकेबाजी करत होता. या दरम्यान साईने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र अर्धशतकानंतर 3 धावा केल्यानंतर साई 53 रन्स करुन आऊट झाला. त्यामुळे गुजरातची 17.3 ओव्हरमध्ये 4 बाद 153 अशी स्थिती झाली.
विजय शंकर याची हॅटट्रिक
A hat-trick of MAXIMUMS, ft. @vijayshankar260 ? ?
Relive those SIXES ? #TATAIPL | #GTvKKR | @gujarat_titans pic.twitter.com/nnRwMh3LtJ
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2023
साई आऊट झाल्यानंतर विजयने सर्व जबाबादारी आपल्या खांद्यावर घेतली. विजय जोरदार फटकेबाजी करु लागला. विजय फक्त फोर सिक्स फोर सिक्स अशाच धावा करत होता. विजयने या दरम्यान सिक्स ठोकत 21 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. विजय शंकर याच्या आयपीएल कारकीर्दीतील हे चौथं शतक ठरलं.
विजयने फक्त 24 बॉलमध्ये 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 24 बॉलमध्ये नाबाद 63 धावांची खेळी केली. विजय शंकर आणि साई सुदर्शन या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने कोलकातसमोर 205 धावांचं आव्हान ठेवता आलं.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | रशीद खान (कॅप्टन), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (क), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.