GT vs KKR IPL 2023 Highlights | रिंकु सिंग याचा धमाका, कोलकाताचा गुजरातवर सनसनाटी विजय

| Updated on: Apr 09, 2023 | 9:40 PM

GT vs KKR IPL 2023 Highlight in Marathi | एकहाती सामना जिंकून देणं आणि मॅचविनर खेळाडू म्हणजे काय असतं हे कोलकाता नाईट रायडर्सच्या 25 वर्षीय रिंकू सिंह याने आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. कोलकाताने जवळपास गमावलेला सामना रिंकून आपल्या एकट्याच्या जीवावर जिंकून दिला

GT vs KKR IPL 2023 Highlights | रिंकु सिंग याचा धमाका, कोलकाताचा गुजरातवर सनसनाटी विजय
Image Credit source: KKR Twitter

अहमदाबाद | कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात जायंट्सवर 3 विके्टसने सनसनाटी विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सने कोलकाताला विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं होतं. कोलकाताने हे आव्हान 7 विकेट्सच्या मोबदल्यात शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. रिंकू सिंह हा कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला. रिंकून शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 5 सिक्स ठोकत कोलकाताला एकहाती मॅच जिंकून दिली.

कोलकाताची सुरुवात अडखळत झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी 100 धावांची शतकी भागीदारी केली. कोलकाताने सामन्यातील आव्हान कायम ठेवलं. मात्र नितीश राणा 45 धावांवर आऊट झाला. त्यानंतर वेंकटेश अय्यर याने एकबाजू लावून धरली. वेंकटेश चांगला खेळत होता. पण वेंकटेश यानेही 83 धावांवर आऊट होत मैदानाबाहेरचा रस्ता धरला. यामुळे कोलकाताची 4 बाद 154 अशी स्थिती झाली.

कोलकाताची सामन्यातून पिछेहाट झाली. यानंतर गुजरातचा हंगामी कॅप्टन राशिद खान ओव्हर टाकायला आला. राशिदने तो ज्यासाठी ओळखला जातो, ती कामगिरी त्याने कली. आपल्या फिरकीसमोर त्याने केकेआरच्या 3 धोकादायक फंलदाजांना आऊट करत हॅट्रिक घेतली. राशिदने कोलकाताच्या डावातील 17 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलमध्ये अनुक्रमे आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि शार्दुल ठाकूर या तिकडीला आऊट करत मोसमातील पहिली हॅटट्रिक घेण्याचा बहुमान मिळवला. त्यामुळे गुजरात जिंकणार हे निश्चित झालं होतं. पण मैदानात रिंकू सिंह नावाचा डेंजर फलंदाज होता.

शेवटच्या ओव्हरचा थरार

कोलकाताला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 29 धावांची गरज होती. रिंकू सिंह याच्यासोबत उमेश यादव हे दोघे बॅट्समन मैदानात होते. राशिदने यश दयाल याला ही ओव्हर टाकायला दिली. उमेश यादवने पहिल्या बॉलवर हुशारीने सिंगल काढत रिंकूला स्ट्राईक मिळवून दिली. त्यानंतर जे झालं ते सर्वांनी पाहिलं.

रिंकून पाठी पुढे न पाहता धडाधड बॅट फिरवायला सुरुवात केली. रिंकूने शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकत अविश्वसनीय कामगिरी केली आणि कोलकाताला जिंकवलं.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Apr 2023 09:32 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | मॅचविनर रिंकु सिंह याची मॅचविनिंग खेळी

    कोलकाताला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 29 धावांची गरज होती. रिंकू सिंह याच्यासोबत उमेश यादव हे दोघे बॅट्समन मैदानात होते. राशिदने यश दयाल याला ही ओव्हर टाकायला दिली. उमेश यादवने पहिल्या बॉलवर हुशारीने सिंगल काढत रिंकूला स्ट्राईक मिळवून दिली. त्यानंतर जे झालं ते सर्वांनी पाहिलं. रिंकूनं पाठी पुढे न पाहता धडाधड बॅट फिरवायला सुरुवात केली. रिंकूने शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकत अविश्वसनीय कामगिरी केली आणि कोलकाताला जिंकवलं.

  • 09 Apr 2023 06:40 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | कॅप्टन नितीश राणा आऊट

    कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन नितीश राणा आऊट झाला आहे.  वेंकटेश अय्यर आणि नितीश राणा या दोघांनी फटकेबाजी करत तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी करत कोलकाताला कमबॅक करुन दिलं.  मात्र अखेर नितीश 45 धावांवर आऊट झाला.

  • 09 Apr 2023 06:28 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | वेंकटेश अय्यरची फिफ्टी, कोलाकाता मजबूत स्थितीत

    वेंकटेश अय्यर याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध वेगवान अर्धशतक ठोकलंय. कॅप्टन नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर या जोडीच्या भागीदारीमुळे कोलकाताने सामन्यात कमबॅक केलंय.

  • 09 Apr 2023 05:51 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | एन जगदीशन आऊट, कोलकाताला दुसरा धक्का

    कोलकाता नाईट रायडर्सने दुसरी विकेट गमावली आहे.  एन जगदीशन 6 रन्स करुन बाद झाला आहे.

  • 09 Apr 2023 05:46 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | रहमनुल्लाह गुरुबाज आऊट, केकेआरची पहिली विकेट

    केकेआरने पहिली विकेट गमावली आहे. रहमनुल्लाह गुरुबाज 15 धावा करुन माघारी परतला आहे.

  • 09 Apr 2023 05:32 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | जगदीशन आणि गुरुबाज सलामी जोडी मैदानात

    कोलाकाता नाईट रायडर्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे.  गुजरातने कोलकाताला विजयासाठी 205 रन्सचं टार्गेट दिलं आहे.

  • 09 Apr 2023 05:23 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | कोलकाताला विजयासाठी 205 रन्सचं टार्गेट

    साई सुदर्शन याची अर्धशतकी खेळी आणि विजयी शंकर याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरात जायंट्सने 200 पार मजल मारली.  विजय शंकर याने अखेरच्या काही षटकांमध्ये केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 204 धावा केल्या. गुजरातने यासह कोलकातासमोर 205 धावांचं मजबूत आव्हान दिलं आहे.

  • 09 Apr 2023 05:14 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | विजय शंकर याचं वादळी अर्धशतक

    विजय शंकर याने सिक्स ठोकत अवघ्या 21 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. विजय शंकर याचं आयपीएल कारकीर्दीतील हे चौथं अर्धशतक ठरलं.

  • 09 Apr 2023 05:04 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | गुजरातची चौथी विकेट

    साई सुदर्शन अर्धशतक ठोकल्यानंतर आऊट झाला आहे. सुदर्शन याने 53 धावांची खेळी केली.

    साई सुदर्शन | 4 × 3, 6 × 2, 38 बॉल 53 रन्स.

    गुजरात टायटन्स | 153-4, 17.3 ओव्हर

  • 09 Apr 2023 04:41 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | सुयश शर्माच्या फिरकीसमोर अभिनव मनोहर बोल्ड

    सुयश शर्मा याने गुजरातला तिसरा धक्का दिलाय. सुयशने अभिनव मनोहर याला क्लिन बोल्ड केलंय. अभिनवने 14 धावा केल्या.

  • 09 Apr 2023 04:34 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | गुजरातने कॅप्टन बदलला

    कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्याआधी गुजरात टायटन्सने कॅप्टन बदलला, कारण जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

    बातमी | GT vs KKR | सामन्याच्या अवघ्या काही मिनिटांआधी कॅप्टन बदलला, नक्की कारण काय?

  • 09 Apr 2023 04:30 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | गुजरातला मोठा धक्का

    गुजरातला मोठा झटका बसला आहे. शुबमन गिल याच्या रुपाने गुजरातने दुसरी विकेट गमावली आहे. शुबमनने 31 बॉलमध्ये 39 धावांची खेळी केली.

  • 09 Apr 2023 04:21 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | गुजरात मजबूत स्थितीत, गिल-सुदर्शन जोडी जमली

    ऋद्धीमान साहा आऊट झाल्यानंतर शुबमन गिलने साई सुदर्शन याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचली आहे.  गुजरातने 10 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 88 धावा केल्या आहेत. शुबमन 36 आणि  साई सुदर्शन 22 धावांवर खेळत आहेत.

  • 09 Apr 2023 03:54 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | गुजरातला पहिला झटका

    गुजरातला सुनील नारायण याने पहिला झटका दिला आहे.  एन जगदीशन याने धावत ऋद्धीमान साहा याचा अफलातून झेल घेतला. साहा याने 17 धावांची खेळी केली.

  • 09 Apr 2023 03:45 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | गुजरातची आश्वासक सुरुवात

    गुजरात टायटन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऋद्धीमान साहा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात खेळत आहे. या दोघांनी गुजरातला आश्वासक सुरुवात दिवली आहे.  गुजरातने 3 ओव्हरमध्ये बिनबाद 24 धावा केल्या आहेत.

  • 09 Apr 2023 03:41 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन

    कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (क), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.

  • 09 Apr 2023 03:40 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन

    रशीद खान (कॅप्टन), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल.

  • 09 Apr 2023 03:33 PM (IST)

    GT vs KKR IPL 2023 Live Score | गुजरात टायटन्सने टॉस जिंकला

    गुजरात टायटन्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन राशिद खान याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात हार्दिक पंड्या याची प्रकृती स्थिर नसल्याने राशिद खान याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे राशिद खान कोलकाता विरुद्ध संघाचं नेतृत्व कसं करतो, याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.

    गुजरातने घरच्या मैदानात टॉस जिंकला

Published On - Apr 09,2023 3:31 PM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.