GT vs MI IPL 2023 Highlights | गुजरातचा मुंबई इंडियन्सवर 55 धावांनी दणदणीत विजय

| Updated on: Apr 26, 2023 | 12:39 AM

GT vs MI IPL 2023 Highlights In Marathi | गुजरात टायटन्सचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला आहे. तर मुंबईने सलग 3 विजयानंतर सलग 2 सामने गमावले आहेत.चेन्नईने या विजयासह मोठा कारनामा केला आहे.

GT vs MI IPL 2023 Highlights | गुजरातचा मुंबई इंडियन्सवर 55 धावांनी दणदणीत विजय

गांधीनगर | आयपीएल 16 व्या मोसमात 25 एप्रिल रोजी 35 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी ही रोहित शर्मा याच्याकडे होती. तर हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सची कॅप्टन्सी करत होता. या सामन्यात  गुजरातने मुंबई इंडियन्सवर 55 धावांच्या फरकाने विजय मिळवला.  गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 208 धावांचं मजबूत आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 152 धावाच करता आल्या. चेन्नईचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला. तर मुंबई इंडियन्सला 7 पैकी 4 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 25 Apr 2023 11:24 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | गुजरातचा मोसमातील 5 वा विजय

    गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला 55 धावांनी पराभूत करत मोसमातील पाचवा विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 208 धावांचं मजबूत आव्हान दिलं होतं. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 152 धावाच करता आल्या. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

  • 25 Apr 2023 11:08 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | नेहल वढेरा आऊट, मुंबईला आठवा ध्कका

    मुंबईने आठवी विकेट गमावली आहे. नेहल वढेरा 21 बॉलमध्ये 40 धावा करुन माघारी परतलाय.

  • 25 Apr 2023 11:06 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | पीयूष चावला आऊट

    मुंबईने सातवी विकेट गमावलीय. पीयूष चावला 18 धावांवर रनआऊट झाला आहे.

  • 25 Apr 2023 10:52 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | सूर्यकुमार यादव आऊट, विजयाची आशा मावळली

    मुंबईने सहावी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे.

  • 25 Apr 2023 10:35 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | मुंबईला गुजरातकडून दे धक्का

    मुंबई इंडियन्सने पुन्हा एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावले आहेत.  राशिद खान याने सामन्याती 8 व्या ओव्हरमध्ये इशान किशन आणि टिळक वर्मा या दोघांना चालतं केलं. तर त्यानंतर नूर अहमद याने मुंबईच्या डावातील 11 व्या षटकात  कॅमरुन ग्रीन आणि टीम डेव्हिड या दोघांचा काटा काढला.

  • 25 Apr 2023 10:20 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | राशिद खान याची करामत, मुंबईला एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के

    राशिद खान याने मुंबईला सामन्यातील आठव्या ओव्हरमध्ये 2 धक्के दिले. राशिदने आधी इशान किशन आणि त्यानंतर टिळक वर्मा या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

  • 25 Apr 2023 10:11 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | इशान किशन आऊट

    मुंबईला दुसरा झटका लागला आहे. राशिद खान याने इशान किशन याला आऊट केलंय. इशानने 21 बॉलमध्ये 13 धावा केल्या.

  • 25 Apr 2023 09:42 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | मुंबईला पहिला झटका

    मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात झाली आहे. गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला 2 धावांवर आऊट केलं.

  • 25 Apr 2023 09:35 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्सला विजयासाठी 208 धावांचं मजबूत आव्हान

    गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 208 धावांचं मजबूत आव्हान दिलं आहे. गुजरातने 6 विकेट्स गमावून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 207 धावा केल्या. गुजरातकडून शुबमन गिल याने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. गिल याने 7 चौकार आणि 1 सिक्स ठोकला. मिलरने अखेरच्या काही चेंडूंपर्यंत जोरदार फटकेबाजी करत 22 बॉलमध्ये 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. अभिनव मनोहर यानेही टॉप गिअर टाकत 21 बॉलमध्ये 42 रन्सची इनिंग केली. तर अखेरच्या काही बॉलमध्ये राहुल तेवितिया याने 5 बॉलमध्ये 3 सिक्ससह नाबाद 20 धावा केल्या. तर विजय शंकर याने 19, कॅप्टन हार्दिक पंड्या याने 13, ऋद्धीमान साहा याने 4 आणि राशिद खाने याने 2* धावा केल्या. मुंबईकडून पियूष चावला याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर कुमार कार्तिकेय, अर्जुन तेंडुलकर, बेहरनडॉर्फ आणि रिले मेरेडिथ या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

  • 25 Apr 2023 09:05 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | अभिनव मनोहर आऊट

    अभिनव मनोहर आऊट झाला आहे. अभिनव मनोहर याने 21 बॉलमध्ये 42 धावांनी निर्णायक खेळी केली.

  • 25 Apr 2023 08:58 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    अभिनव मनोहर आणि डेव्हिड मिलर या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे.

  • 25 Apr 2023 08:38 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | गुजरातला चौथा धक्का

    गुजरातने चौथा विकेट गमावली आहे. विजय शंकर 19 धावा करुन तंबूत परतला आहे.

  • 25 Apr 2023 08:27 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | शुबमन गिल माघारी

    ऋद्धीमान साहा, हार्दिक पंड्या यांच्यानंतर शुबमन गिल हा आऊट झाला आहे. शुबमनने 56  धावा केल्या.

  • 25 Apr 2023 08:07 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | गुजरातला मोठा झटका

    गुजरात टायटन्सने मोठी विकेट गमावली आहे. गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्या 13 धावा करुन आऊट झाला.

  • 25 Apr 2023 07:49 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | गुजरात टायटन्सला पहिला धक्का

    गुजरात टायटन्स टीमने पहिली विकेट गमावली आहे. ऋद्धीमान साहा 4 धावा करुन करुन बाद झाला आहे.

  • 25 Apr 2023 07:32 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | गुजरातच्या बॅटिंगला सुरुवात

    गुजरात टायटन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऋद्धीमान साहा आणि शुबमन गिल सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.  अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून पहिली ओव्हर टाकत आहे.

  • 25 Apr 2023 07:11 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, के कार्तिकेय सिंग, एन वडेरा, रायली मेरेडिथ, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

  • 25 Apr 2023 07:09 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन |

    गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी आणि नदीम अहमद.

  • 25 Apr 2023 07:02 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | मुंबईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

    मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुजरात मुंबईसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 25 Apr 2023 05:44 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | आकडेवारी कुणाच्या बाजूने

    गुजरात टायटन्स टीमने आयपीएलमध्ये गेल्या वर्षी 15 व्या सिजनमधून पदार्पण केलं होतं. गुजरातचं यंदाचं दुसरंच वर्ष आहे.  गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यात एकूण 1 वेळाच आमनासामना झाला आहे. मुंबईने या एकमेव सामन्यात गुजरातवर विजय मिळवला होता.

  • 25 Apr 2023 05:37 PM (IST)

    GT vs MI IPL 2023 Live Score | गुजरात विरुद्ध मुंबई आमनेसामने

    आयपीएल 16 व्या हंगामात आज गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध 5 वेळ ट्रॉफीविजेता मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत.

Published On - Apr 25,2023 5:35 PM

Follow us
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.