Hardik Pandya : हार्दिकचा घोर अपमान, चाहत्याने तोंडावर म्हटलं छपरी, व्हीडिओ व्हायरल
Hardik Pandya Chapari Video : हार्दिक पंड्याला दिवसेंदिवस चाहत्यांचा संताप सहन करावा लागत आहे. एका चाहत्याने हार्दिकची सर्वांसमोर लाज काढली. पाहा व्हायरल व्हीडिओ.
हार्दिक पंड्या याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यापासून क्रिकेट चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाआधी हार्दिक पंड्या याला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात घेतलं. इतकंच नाही, तर हार्दिकला कर्णधार करण्यात आलं. रोहित शर्मा याच्याकडे असलेलं कर्णधारपद काढून घेतल्याने क्रिकेट चाहत्यांचा सर्वात जास्त रोष हा हार्दिकवर आहे. त्यामुळे हार्दिकला उठता बसता नेटकऱ्यांकडून शिव्याची लाखोली वाहिली जात आहे. आता तर एकाने कहरच केलाय. एका क्रिकेट चाहत्यांनी हार्दिकचा तोंडावरच अपमान केलाय. याचा व्हीडिओ व्हायरल झालाय.
गुजरात आणि मुंबई या दोन्ही संघांचा आयपीएल 17 व्या हंगामातील पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. हार्दिक पहिल्यांदाच मुंबईचं नेतृत्व करत होता. हार्दिक आपल्या आधीच्या टीम विरुद्ध होम ग्राउंडमध्ये खेळत होता. दोन्ही संघांचे चाहते त्याच्यावर नाराज होते. त्यामुळे पंड्याला दोन्ही बाजूने टीका सहन करावी लागली. त्यात एक व्हीडिओ समोर आलाय. त्या व्हीडिओत एक जण हार्दिकला तोंडावर “छपरी” असं बोलताना ऐकायला मिळत आहे.
नक्की काय घडलं?
हार्दिक पंड्या ड्रेसिंग रुमच्या दिशेने जात होता. तेव्हा स्टँडमधील चाहत्यांनी हार्दिकवर निशाणा साधला. हार्दिक स्टँडमधून जात असताना त्याला “छपरी छपरी” असं म्हणत डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र पंड्या कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेला. हा व्हीडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
हार्दिकला डिवचलं
They called hardik pandya chhapri on his face 😭 this is unreal humiliation #chapri #hardikpandyapic.twitter.com/w0gmFhzgFe
— VIVEK ( #𝐑𝐑 𝐊𝐚 𝐏𝐚𝐫𝐢𝐯𝐚𝐫 ) (@UniquePullShot) March 25, 2024
दरम्यान पहिल्या सामन्यात गुजरात विरुद्ध 6 धावांनी पराभूत झाल्यानंतर मुंबईचा दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. मुंबईचा पुढील सामना हा 27 मार्च रोजी असणार आहे. मुंबई यंदाच्या मोसमातील दुसरा सामना हा हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे.
मुंबई इंडियन्स टीम | हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, विष्णू विनोद, शम्स मुलानी, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, डेवाल्ड ब्रेविस, क्वेना मफाका आणि नमन धीर.