IPL 2024 : रोहितची पराभवानंतर हार्दिकवर आगपाखड, मैदानातच सुनावलं
Rohit Sharma Angry On Hardik Pandya : कॅप्टन हार्दिक पंड्याचं वागणं रोहित शर्माला काय पटलं नाही. त्यामुळे रोहितने मागचा पुढचा विचार न करता भर मैदानातच हार्दिकची शाळा घेतली.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील पाचवा सामना रविवारी 25 मार्च रोजी पार पडला. गुजरात विरुद्ध मुंबई हे दोन्ही संघ या हंगामातील आपला पहिला सामना खेळले. गुजरातने शुबमन गिल याच्या नेतृत्वात आपल्या होम ग्राउंडरमध्ये अर्थात नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजय मिळवला. तर मुंबईने 2012 पासून सुरु केलेली सलामीच्या सामन्यातील पराभवाची परंपरा कायम ठेवली. हार्दिक पंड्या याला आपल्या नेतृत्वातही मुंबईला विजयी सुरुवात करुन देण्यात यश आलं नाही. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा या दोंघांचा पराभवानंतरचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नक्की काय झालं?
रोहित शर्मा सामन्यानंतर गुजरात टीमच्या खेळाडूंसोबत मैदानात चर्चा करत होता. हार्दिक पंड्या तितक्यात आला. रोहित शर्माला मागून मीठी मारली. रोहित शर्माला बहुतेक हेच खटकलं असावं. रोहित शर्मा मागे फिरला. रोहितने हार्दिकला खरी खोटी सुनवाली. रोहित या व्हीडिओत अक्षरक्ष हार्दिकवर संतापलेला दिसत आहे. हा व्हीडिओ असंख्य नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गुजरात-मुंबई सामन्यात काय झालं?
मुंबईला विजयासाठी मिळालेल्या 169 धावांचा पाठलाग करताना 162 धावांपर्यंतच पोहचता आलं. रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस या दोघांनी 43 आणि 46 धावा केल्या. मुंबईने अखेरपर्यंत चांगली लढत देत गुजरातला सडेतोड उत्तर दिलं. आता सामना अखेरच्या ओव्हरमध्ये पोहचला. मुंबईला विजयासाठी 6 बॉलमध्ये 19 धावांची गर होती. कॅप्टन हार्दिक मैदानात होता. हार्दिकने काही मोठे फटके मारले. मात्र त्यानंतर तो आऊट झाला. हार्दिक आऊट होताच सामना संपल्यात जमा झाला.
….आणि रोहित हार्दिकवर बरसला
It’s clearly visible that Rohit Sharma didn’t like when Hardik Pandya Hugged him from back. . He was looking frustrated.
I think Rohit Sharma didn’t expected what Hardik did in fielding . Hardik should change his behaviour to become Captain Hardik Pandya. pic.twitter.com/g43Ace4XyR
— Satya Prakash (@Satya_Prakash08) March 25, 2024
मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टीम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.
गुजरात टायटन्स प्लेईंग इलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर आणि स्पेन्सर जॉन्सन.