GT vs MI : कॅप्टन हार्दिकसमोर रोहितमुळे पहिल्याच सामन्यात मोठं आव्हान
Gujarat Titans vs Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्यामुळे नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पंड्या अडचणीत आला आहे. पहिल्याच सामन्यात हार्दिकसमोर मोठं आव्हान आहे.
आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा आज 24 मार्च रोजी पहिला टप्पा पार पडणार आहे. शनिवारनंतर आज रविवारीही डबल हेडरचा थरार क्रिकेट चाहत्यांना अनुभवता येणार आहे. डबल हेडरमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात पार पडणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ आपल्या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळण्यासाठी सज्ज आहेत. युवा शुबमन गिल याच्याकडे गुजरातचं कर्णधारपद आहे. तर हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. हार्दिकसमोर पहिल्याच सामन्यात मोठं आव्हान आहे. हार्दिकसमोर मुंबईसाठी गेल्या 11 वर्षांची सुरु असलेली परंपरा मोडीत काढण्याचं आव्हान आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या हंगामातील आपला पहिला सामना हा 2012 साली जिंकला होता. त्यानंतर 2013 ते 2023 पर्यंत मुंबईला एकदाही आयपीएलमधील आपला पहिला सामना जिंकता आलेला नाही. रोहित शर्मा याने 2013 पासून मुंबईचं नेतृत्व केलं. रोहितने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. मात्र रोहितला सुरुवातीचा सामना जिंकून देण्यात काय यश आलं नाही. आता हार्दिककडे पलटणची सूत्रं आहेत. त्यामुळे हार्दिकसमोर मुंबईला गुजरातवर मात करुन विजयी सुरुवात करुन देण्याचं भलं मोठं आव्हान आहे.
दरम्यान गुजरात विरुद्ध मुंबई आयपीएलमध्ये 4 सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध कडवी टक्कर दिली आहे. मुंबईने 2 सामने जिंकलेत. तर गुजरातनेही मुंबईला तितक्याच सामन्यात पराभूत केलंय. त्यामुळे यंदाचा दोन्ही संघांचा सलामीचा सामना हा निश्चित चुरशीचा होणार आहे.
गुजरात टायटन्स टीम : शुबमन गिल (कॅप्टन), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, उमेश यादव, नूर अहमद, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, जयंत यादव, संदीप वॉरियर, शाहरुख खान, अभिनव मनोहर, शरथ बीआर, आर साई किशोर, दर्शन नळकांडे, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला उमरझाई आणि सुशांत मिश्रा.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, विष्णू विनोद, शम्स मुलानी, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस, क्वेना मफाका आणि नमन धीर.