GT vs MI Eliminator : गुजरात आणि मुंबईमध्ये कोण मारणार फायनलचं तिकिट? मुंबईच्या ‘या’ त्रिमुर्तींवर मोठी जबाबदारी!

| Updated on: May 26, 2023 | 3:36 PM

GT vs MI Eliminator IPL 2023 Live Socre Updates : फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने जागा मिळवली आहे. आज होणाऱ्या सामन्यात दुसरा संघ कोणता असणार हे स्पष्ट होणार आहे.

GT vs MI Eliminator : गुजरात आणि मुंबईमध्ये कोण मारणार फायनलचं तिकिट? मुंबईच्या 'या' त्रिमुर्तींवर मोठी जबाबदारी!

मुंबई : आयपीएलमधील मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये दुसरा एलिमिनेटर सामना होणार आहे. या सामन्यामध्ये जो संघ बाजी मारणार तो थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने जागा मिळवली आहे. आज होणाऱ्या सामन्यात दुसरा संघ कोणता असणार हे स्पष्ट होणार आहे. तिन्ही संघानी विजेतेपदावर नाव कोरलं आहे.

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये एकूण 3 वेळा भिडले आहेत. त्यापैकी 16 व्या मोसमातील साखळी फेरीत एकूण 2 वेळा आमनेसामने हे दोन्ही संघ आले आहेत. मुंबईने या 3 पैकी 2 मॅचमध्ये गुजरातचा सुपडा साफ केलाय. तर गुजरातनेही एकदा विजय मिळवलाय. आजच्या सामन्यामध्ये पलटणच्या या त्रिमुर्तींवर मोठी जबाबदारी असणार आहे.

मुंबईची गोलंदाजी कमकुवत असल्यामुळे त्यांना मोठी चिंता होती. मात्र मागील दोन तीन सामन्यांमध्ये पलटणच्या पियुष चावला 21 विकेट्स, जेसन बेहरेनडॉर्फ 14 विकेट्स आणि आकाश मधवाल 13 विकेट्स यांच्यावर मोठी भिस्त असणार आहे. गुजरातचा सलामीवीर शुबमन गिल 722 धावांसह फॉर्ममध्ये आहे. गुजरातसाठी हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर यांचा अजुनही सूर गवसलेला दिसून आला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांना आपल्या खेळात सुधारणा करावी लागणार आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य संघ :

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, दासून शनाका, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, पियुष चावला, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 26 May 2023 05:04 AM (IST)

    GT vs MI Eliminator :

    आता बाकी असलेल्या तीन संघांनीही विजेतेपदावर नाव कोरलेलं आहे. गतवर्षी गुजरात टायटन्स चॅम्पिअन झाले होते. जर त्यांनी मुंबई आणि सीएसकेला पराभूत केलं तर दुसऱ्यांदा तो ट्रॉफी जिंकणार आहेत. मुंबईने हीच किमया साधली तर तो एकूण सहावेळा चॅम्पिअन ट्रॉफी जिंकतील. सीएसके तर आता फक्त एक पाऊस दूर असून ते पाचव्यांदा जिंकतील.

Published On - May 26,2023 5:00 AM

Follow us
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.