Shubman Gill ची नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फटकेबाजी, पंजाब विरुद्ध अर्धशतक
Shubman Gill Fifty : शुबमन गिल आयपीएलच्या 17 व्या मोसमात आतापर्यंत हायस्कोअर करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल याची बॅट पुन्हा एकदा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तळपली आहे. शुबमन गिल याने आयपीएलच्या 17 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध विस्फोटक अर्धशतक ठोकलं. शुबमन गिल याचं हे अर्धशतक अनेक अर्थाने विशेष ठरलं. शुबमनचं कर्णधार म्हणून हे पहिलं अर्धशतक ठरलं. शुबमनने या हंगामातून कर्णधार म्हणून पदार्पण केलंय. तसेच शुबमन या हंगामात गुजरातकडून अर्धशतक करणारा पहिलाच फलंदाज ठरला.
शुबमनने आतापर्यंत टीम इंडियासाठी असो किंवा गुजरात टायटन्ससाठी, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अप्रतिम कामगिरी केली. शुबमनने पंजाब विरुद्ध तसाच तडाखा दाखवला. शुबमनने 31 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने आणि 167.74 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावलं. शुबमनचं हे आयपीएल कारकीर्दीतील 19 वं तर पंजाब विरुद्धचं सहावं अर्धशतक ठरलं.
शुबमनची पंजाब विरुद्धची आकडेवारी
शुबमन गिल याचा पंजाब विरुद्ध कायम उल्लेखनीय कामगिरी करत आला आहे. शुबमनने याआधी पंजाब किंग्स विरुद्ध 65 नाबाद, 57, 57, 9, 7, 96, 9, आणि 67 अशा धावा केल्या. दरम्यान शुबमनला या 17 व्या हंगामातील पहिला शतकवीर होण्याची संधी होती. मात्र शुबमन शतकापासून 11 धावा दूर राहिला. शुबमनने 48 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 6 फोरच्या मदतीने नाबाज 89 धावांची खेळी केली. शुबमन गिलने केलेली 89 धावांची खेळी ही या 17 व्या मोसमातील सर्वोच्च ठरली.
नरेंद्र मोदी स्टेडियममधील कामगिरी
दरम्यान शुबमन गिल याने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये याआधी खेळलेल्या 14 सामन्यांमध्ये 61.33 सरासरी आणि 156.60 च्या स्ट्राईक रेटने 736 धावा केल्या आहेत. शुबमनने या दरम्यान 2 शतकं आणि 3 अर्धशतक ठोकली आहेत. शुबमनची 129 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
शुबमन गिलची 89 धावांची नाबाद खेळी
Innings Break ‼️
Shubman Gill’s unbeaten 8️⃣9️⃣ helps #GT set a target of 2️⃣0️⃣0️⃣
Will #PBKS reach this target? 🎯
Follow the Match ▶️ https://t.co/0Sy2civoOa#TATAIPL | #GTvPBKS pic.twitter.com/NICJDnQ5ML
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2024
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, सॅम करान, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.
गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, केन विल्यमसन, विजय शंकर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव आणि दर्शन नळकांडे.