अहमदाबाद : क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागून असलेला आयपीएलचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी गुजरातच्या अहमदाबाच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनदमध्ये क्रिकेटप्रेमींना अव्वाच्या सव्वा दराने तिकीटांची खेरीद केली आहे. क्रिकेटसमोर पैसेही शून्य असंच म्हणावं लागेल. रविवारी अहमदाबादमधील (ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) फायनल सामना खेळवला जाणार आहे. ही लढत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात विजेतेपदाची होणार आहे. शुक्रवारी झालेल्या क्वालिफायर-2 सामन्यात राजस्थानने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला. डियन प्रिमीयर लीगचा (IPL Qualifier 2) क्वालिफायर 2 चा सामना खूपच एकतर्फी झाला. राजस्थान रॉयल्सने RCB ने दिलेलं 158 धावांच टार्गेट आरामात पार केलं. जोस बटलरने 60 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. यात 10 चौकार आणि 6 षटकार होते. बटलरने षटकार ठोकून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दरम्यान, रविवारचा फायनल सामना कधी आणि कुठे पाहणार, ते जाणून घ्या…
राजस्थान रॉयल्स हा प्लेऑफमध्ये स्थान मिळविणारा तिसरा संघ होता. परंतु निव्वळ धावगतीनुसार ते गुणतालिकेत पहिल्या 2 मध्ये राहिले. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानसाठी गट स्टेज चढ-उतार होता, संघाची फलंदाजी तसेच गोलंदाजी अप्रतिम होती. ग्रुप स्टेजच्या 14 मॅचमध्ये राजस्थानने 9 जिंकले आणि 5 मॅच गमावल्या.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना 28 मे (रविवार) रोजी खेळवला जाणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना रात्री आठ वाजता सुरू होईल. नाणेफेक साडेसात वाजता होईल.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.