GT vs RR IPL 2023 Live Score : राजस्थान रॉयल्सचा गुजरात संघावर 3 विकेट्स राखून विजय
दोन्ही संघांचे गुण समान असून आज कोण मारणार बाजी आणि कोण गुणतालिकेमध्ये मिळवणार पहिलं स्थान हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई : आयपीएलमधील गुजरात टायटन्स वि. राजस्थान रॉयल्स यांच्यामधील 23वा सामना काही वेळात सुरू होणार आहे. दोन्ही संघांचे गुण समान असून आज जो संघ जिंकेल तो गुणतालिकेमध्ये पहिलं स्थान मिळवणार आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
संभाव्य इलेव्हन: रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पांड्या (क), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, विजय शंकर, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल
संभाव्य इलेव्हन: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कॅन्डर आणि विकेट), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
LIVE Cricket Score & Updates
-
राजस्थानचा रॉयल विजय
गुजरातन टायटन्स संघाच्या 178 धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन 60 धावा आणि हेटमायर नाबाद 56 धावा या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाने विजय मिळवला. राजस्थान संघाने या विजयासह गुणतालिकेमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. इतकंच नाहीतर गतवर्षीच्या फायनलमधील पराभवाचा बदलाही राजस्थानने घेतला आहे.
-
संजू सॅमसनचे अर्धशतक
GT vs RR IPL 2023 Live Score :
संजू सॅमसनचे अर्धशतक पूर्ण केलं आहे. 29 चेंडूत त्याने 50 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 षटकार आणि दोन चौकार मारले आहेत.
-
-
करामती खानचा झलवा
GT vs RR IPL 2023 Live Score : 9 ओव्हर 50-3
4 धावांवर 2 विकेट्स गेल्या असताना संजू आणि देवदत्त यांनी एक चांगली भागीदारी केली होती. मात्र करामती खान याने येताच देवदत्तला आपल्या गुगलीवर कॅट आऊट केलं आहे. रशिद खानने 3 वेळा देवदत्तला आऊट केलं आहे.
-
मोहम्मद शमीचा कडक बोल्ड
GT vs RR IPL 2023 Live Score : 3 ओव्हर 4 -2
मोहम्मद शमीने बटलरला सेट अप लावून बोल्ड केलं. बटलरला आज साधं खातंही उघडता आलं नाही. राजस्थानचा संघाचा कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कल मैदानात आहेत.
-
राजस्थान रॉयल्सला पहिला झटका
GT vs RR IPL 2023 Live Score :
राजस्थान रॉयल्स गुजरातने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांना पहिला झटका बसला आहे. हार्दिकने यश मिळवून दिलं आहे. यशस्वी जयस्वाल 1 धाव काढून बाद झाला असून रॉयल्सने दोन ओव्हरमध्ये 1 विकेट गमावत 3 धावा केल्या आहेत.
-
-
चतुर चहलने पंड्याला फसवलं
GT vs RR IPL 2023 Live Score :
हार्दिक पंड्या मोठा फटका खेळण्याच्या नादात कॅच आऊट झाला आहे. चहलने त्याला आपल्या जाळ्यात ओढलं. 28 धावांवर पंड्या माघारी परतला आहे. मैदानाता आता किलर मिलर उतरला आहे.
-
पंड्या-गिलची भागीदारी
GT vs RR IPL 2023 Live Score : 8 ओव्हर 72-2
दुसरी विकेट गेल्यावर हार्दिक पंडया आणि शुबमन गिल यांनी अवघ्या 18 चेंडू त 40 धावा केल्या आहेत. आता पंड्या नाबाद 19 तर गिल 27 धावांवर नाबाद आहे.
-
गुजरातला दुसरा धक्का
GT vs RR IPL 2023 Live Score :
पहिली विकेट गेल्यानंतर शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चांगली भागीदारी केली होती. मात्र चुकीच्या कॉलमुळे 20 धावांवर सुदर्शन बाद झाला आहे.
-
ट्रेंड बोल्ट याचा पहिला झटका
पहिल्याच ओव्हरमध्ये बोल्टने वृद्धिमान साहाला कॅच आऊट केलं आहे. 1 चौकार मारत साहा तंबूत परतला आहे. साई सुदर्शन मैदानात आला आहे.
-
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
GT vs RR IPL 2023 Live Score :
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (w), शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पांड्या (क), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
-
GT vs RR IPL 2023 Live Score :
राजस्थान रॉयल्स संघाने टॉस, जिंकला असून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
Published On - Apr 16,2023 7:06 PM