RR vs GT Playing XI IPL 2022: गुजरातमध्ये आणखी एका अफगानी स्टारची एंट्री, राजस्थानच्या संघात बदल नाही?

आयपीएल 2022 (IPL-2022) मध्ये पदार्पण केलेल्या गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) पहिल्या सत्रातच आपली छाप पाडली आहे. या संघाने पहिले तीन सामने जिंकले, पण चौथ्या सामन्यात त्यांना पहिल्या पराभवाची चव चाखावी लागली.

RR vs GT Playing XI IPL 2022: गुजरातमध्ये आणखी एका अफगानी स्टारची एंट्री, राजस्थानच्या संघात बदल नाही?
RR vs GT Playing XI IPL 2022Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 5:00 PM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL-2022) मध्ये पदार्पण केलेल्या गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) पहिल्या सत्रातच आपली छाप पाडली आहे. या संघाने पहिले तीन सामने जिंकले, पण चौथ्या सामन्यात त्यांना पहिल्या पराभवाची चव चाखावी लागली. शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने त्यांचा पराभव केला. मात्र उर्वरित सामन्यांप्रमाणे हा सामनाही अतिशय रोमांचक झाला, मात्र यावेळी गुजरातला विजय मिळवता आला नाही. आता त्यांच्या पुढील सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातचा सामना संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) होणार आहे. राजस्थानचा संघदेखील सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यांनी शेवटच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला.

पॉइंट टेबलमध्ये या दोन संघांचे स्थान पाहिल्यास राजस्थानचा संघ चार सामन्यांत तीन विजय आणि एक पराभवासह पहिल्या क्रमांकावर आहे. तर गुजरात टायटन्सचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. चार सामन्यांत त्यांनादेखील तीन विजय आणि एका परभावाचा सामना करावा लागला आहे. मात्र नेट रनरेट कमी असल्यामुळे हा संघ गुण समान असूनही चौथ्या क्रमांकावर आहे. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमनेसामने उभे ठाकणार असून एक अटीतटीचा सामना सर्वांना पाहायला मिळेल.

गुजरातच्या संघात बदल

गुजरातचा संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही चांगली चालली आहे. फलंदाजीत त्यांच्यासाठी एक चिंता आहे आणि ती म्हणजे सलामीवीर मॅथ्यू वेडचा फॉर्म. वेड अजून रंगात आलेला नाही. तो सतत अपयशी ठरतोय. अशा स्थितीत त्याची संघातली जागा धोक्यात आली आहे. प्लेईंग इलेव्हनमधील जागा तो गमावणार हे जवळपास निश्चित आहे. त्याच्या जागी रहमानउल्ला गुरबाजला संघात स्थान मिळू शकते. त्याचवेळी दर्शन नळकांडे यालाही संधी मिळाली मात्र तो छाप पाडू शकला नाही. अशा स्थितीत पंड्या गुरुवारच्या सामन्यात दर्शनला संघातून वगळू शकतो. त्याच्या जागी वरुण अॅरोन किंवा आर. साई किशोरला संधी मिळू शकते.

राजस्थानच्या संघात बदल होण्याची शक्यता कमी

दुसरीकडे, राजस्थानच्या संघावर नजर टाकली तर, गेल्या सामन्यात यशस्वी जैस्वालला वगळण्यात आले आणि रॅसी व्हॅन डर डुसेनला संधी देण्यात आली. मागील सामन्याद्वारे देवदत्त पडिक्कल पहिल्यांदाच सलामीला उतरला होता. राजस्थानचा संघ या सामन्यातही हीच जोडी कायम ठेवू शकतो. संघ व्यवस्थापन त्यांच्या विनिंग टीम कॉम्बिनेशनमध्ये छेडछाड करण्याच्या मूडमध्ये नसेल.

राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेईंग 11

संजू सॅमसन (कर्णधार), जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, रसी व्हॅन डुसें, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, कुलदीप सेन, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेईंग 11

हार्दिक पंड्या (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, आर. साई किशोर

इतर बातम्या

IPL 2022 Points Table: आयपीएलच्या गुणतालिकेत तुमचा संघ कुठे, तुमच्या आवडत्या संघाची आगेकुच की पिछेहाट?, जाणून घ्या

IPL 2022 MI vs PBKS Live Streaming: जाणून घ्या मुंबई विरुद्ध पंजाब सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IPL 2022, Orange Cap, Purple cap : 9 षटकार मारुन उथप्पाची आगेकुच, ऑरेंज कॅपच्या यादीत कोण आहे पुढे? पर्पल कॅपवर कुणाचं राज्य?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.