अहमदाबाद : आयपीएलच्या 16 पर्वामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यामधील फायनल सामन्यात चेन्नईने 5 विकेट्सने विजय मिळवला आहेच. अखेरच्या चेंडूपर्यंत आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात सीएसकेने विजय मिळवत इतिहास रचला आहे. गुजरातने दिलेलं 215 धावांचं लक्ष्य पावसामुळे 171 धावांचं करण्यात आलं होतं. हा सामना शेवटपर्यंत कोण जिंकेल काही अंदाज येत नव्हता मात्र रविंद्र जडेजाने दोन चेंडूत 10 धावांची गरज असताना मारलेल्या षटकार आणि चौकार मारत हा सामना सीएसकेने जिंकला.
या विजयासह सीएसकेने आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा विजेतेपद जिंकण्याच्या मुंबईच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गुजरातच्या 170 धावांचा पाठलाग करताना सीएसकेकडून ऋुतुराज गायकवाड 26 धावा , डेवॉन कॉनवे 47 धावा, अजिंक्य रहाणे 27 धावा,शिवम दुबे 32 धावा, अंबाती रायडू 19 धावा आणि रवींद्र जडेजा नाबाद 15 धावा करत विजय मिळवला.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (W), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (C), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋुतुराज गायकवाड़, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कप्तान, विकेटकीपर), दीपक चाहर, मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा
शेवटच्या चेंडूवर सीएसकेला विजयासाठी चार धावांची गरज होती. सीएसकेने चार धावा केल्या आणि गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. CSK पाचव्यांदा आयपीएलचा विजेता ठरला आहे. रवींद्र जडेजाने 6 चेंडूत 15 धावांची नाबाद मॅचविनिंग खेळी केली. सीएसकेने पाचव्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं आहे.
शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलध्ये 13 धावांची गरज आहे. मैदानात शिवम दुबे आणि जडेजा आहेत.
अंबाती रायडू याने 19 धावा करत सामना खेचला खरा पण त्याला मोहित शर्माने आऊट केलं. त्यानंतर पाठोपाठ धोनीही पहिल्या बॉलवर आऊट झाला आहे. आता 12 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे.
सीएसकेला तिसरा झटका बसला असून अजिंक्य रहाणे आऊट झाला आहे. 27 धावांवर असताना रहाणेला मोहित शर्माने त्याला कॅचआऊट केलं आहे.
नूर अहमदने एकाच ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीरांना माघारा पाठवलं आहे. ऋुतुराज गायकवाड मोठा फटका खेळण्याच्या नादात कॅचआऊट झाला. 16 चेंडूत त्याने 23 धावा केल्या. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. तर कॉनवेही 45 धावांवर मोठा खेळण्याच्या प्रयत्नात कॅचआऊट झाला.
6 ओव्हरमध्ये सीएसके संघाने 72 धावा केल्या आहेत. दोन्ही सलामीवीर गुजरातच्या गोलंदाजांवर तुटून पडलेले आहेत. 22 बॉलमध्ये कॉनवेने 44 धावा केल्या आहेत.
पॉवर प्ले मध्ये चार ओव्हर्समध्ये सीएसकेने 52 धावा केल्या आहेत. यामध्ये ऋुतुराज गायकवाडने 12 बॉलमध्ये 23 तर डेवॉन कॉनवेने 12 बॉलमध्ये 27 धावा केल्या आहेत.
मोहम्मद शमीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या असून यामध्ये सलामीवीर गायकवाड याने दोन चौकार मारले आहेत.
सामन्याला सुरूवात झाली असून मैदानात गायकवाड आणि कॉनवे मैदानात उतरले आहेत. 170 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यात चांगल्या भागीदारीची आवश्यकता आहे.
12 वाजून 10 मिनिटांनी सामना सुरू होणार आहे, आता मॅच 15 ओव्हरची होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सीएसकेल जिंकण्यासाठी 170 धावांचं आव्हान आहे. यामध्ये आता पॉवर प्ले 4 ओव्हर्सचा असणार असून 5 गोलंदाज 3 ओव्हर टाकू शकतात.
11.30 वाजता पंच पुन्हा मैदानाची पाहणी करतील. सध्या तरी सामना सुरू होण्याची शक्यता नाही. पिचची अवस्था अतिशय वाईट दिसत आहे.
पावसामुळे बाजूची खेळपट्टी खराब झाली आहे. ही खेळपट्टी कोरडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सामना लवकर सुरू होण्याची शक्यता नाही. मैदानाची पाहणी करण्यासाठी पंच 10.45 वाजता मैदानावर येतील. सध्या बाजूची खेळपट्टी अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. त्या खेळपट्टीवर चालणेही अवघड आहे.
चेन्नई सुपर किंग्जसमोर विजेतेपदासाठी 215 धावांचे आव्हान आहे. गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या आहेत. सईने 96 धावांची तुफानी खेळी खेळली. गुजरातच्या गोलंदाजीसमोर हे लक्ष्य गाठणे धोनीच्या संघासाठी खूप कठीण जाणार आहे.
19 ओव्हरमध्ये चेन्नईच्या तुषार देशपांडे याला चांगलंच चोपलं आहे. हार्दिक आणि साई सुदर्शनने या ओव्हरमध्ये 18 धावा कुटल्या.
साई शानदार फलंदाजी करत आहे. 17 षटकांनंतर गुजरातची धावसंख्या 2 गडी गमावून 173 धावा आहे. तीन षटकांचा खेळ शिल्लक आहे. साई 40 चेंडूत 76 धावा करून खेळत आहे. गुजरातची स्थिती मजबूत दिसत आहे.
साहानंतर साई सुदर्शनने 33 चेंडूत 52 धावा करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या साईने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
गुजरातने 13 षटकांत 1 गडी गमावून 124 धावा केल्या आहेत. साहाने अर्धशतक करत संघाला आक्रमक सुरूवात करून दिली. दिपक चहरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो कॅचआऊट झाला.
11.1 ओव्हरमध्ये गुजरातने 100 धावा पूर्ण केल्या आहेत. मैदानावर साहा 47 धावा आणि सुदर्शन 14 धावांवर खेळत आहे.
रविंद्र जडेजा टाकत असलेल्या सातव्या ओव्हरमध्ये धोनीने पुन्हा एकदा आपल्या हातांनी जादू दाखवत गिलला स्टम्प आऊट केलं आहे. गिल 20 चेंडूत 39 धावा करून आऊट झाला आहे.
ऋद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांची अर्धशतकी भागीदारी झाली आहे. 6 ओव्हरमध्ये दोघांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. शुबमन गिलने 17 बॉलमध्ये 36 धावा तर ऋद्धिमान साहाने 19 बॉलमध्ये 26 धावांसह संघाच्या बिनबाद 62 धावा करून दिल्या आहेत.
4 ओव्हरमध्ये गुजरातने 38 धावा केल्या आहेत. ऋद्धिमान साहा 21 तर शुबमन गिल 17 धावांवर खेळत आहेत. दोघांनीही तिसरा गिअर टाकलेला असून चेन्नईच्या गोलंदाजांना फोडत आहेत.
दीपक चहरने मोठी चूक केली आहे. चहरने गिलचा झेल सोडला त्यावेळी गिल अवघ्या 3 धावांवर खेळत होता.
टॉस जिंकल्यावर धोनीने बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर सामना सुरू होण्याआधी राष्ट्रगीतसाठी दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात आले आहेत.
चेन्नई आणि गुजरात दोन्ही संघांनी मागील सामन्यातीलच प्लेइंग 11 कायम ठेवली आहे. फायनल सामन्यात संघामध्ये कोणताही बदल केला नाही.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (W), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (C), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋुतुराज गायकवाड़, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कप्तान, विकेटकीपर), दीपक चाहर, मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा
GT vs CSK IPL 2023 Final: सीएसके संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ahmedabad Weather Update: एक्यूवेदरचा रिपोर्ट काय सांगतो? एक्यूवेदरचा रिपोर्ट एक्युरेट ठरणार का? किती वाजता अहमदाबादमधील हवामान बदलणार ते जाणून घ्या. वाचा सविस्तर….
GT vs CSK IPL 2023 Final : दुसऱ्याबाजूला 29 मे ही तारीख हार्दिक पांड्या आणि त्याच्या टीमसाठी खूप स्पेशल आहे. 2011 साली 28 मे रोजी CSK साठी काय घडलेलं? ते जाणून घ्या. वाचा सविस्तर….
पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, संध्याकाळी जो पाऊस सुरू झाला. तो रात्री 11 वाजताच थांबला. त्यामुळे आजही अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास, सामन्यावर पुन्हा एकदा विरजण पडू शकतं. वाचा सविस्तर….
IPL 2023 Final reserve day : रिझर्व्ह डे ला होणाऱ्या फायनलला CSK चे फॅन्स धोनीशी निगडीत एका मोठ्या घटनेशी जोडत आहेत. सीएसकेच्या चाहत्यांनी याला ‘देजा वू’ म्हटलय. MS आज मॅच खेळण्यासाठी अखेरची वेळ मैदानात उतरणार का? वाचा सविस्तर….
IPL 2023 Final on Reserve Day : पावसामुळे काल IPL 2023 चा फायनल सामना होऊ शकला नाही. आज अहमदाबादमधल हवामान कसं असेल? यावर क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे. वाचा सविस्तर….
GT vs CSK : फायनल सामना उद्या म्हणजेच 29 मे ला नरेंद्र मोदी स्टेडिअममध्येच पार पडणार आहे. नेहमीप्रमाणे फायनल सामनाही संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होणार असून सात वाजता टॉस होणार आहे.
The #Final of the #TATAIPL 2023 has been moved to the reserve day on 29th May – 7:30 PM IST at the Narendra Modi Stadium, Ahmedabad.
Physical tickets for today will be valid tomorrow. We request you to keep the tickets safe & intact. #CSKvGT pic.twitter.com/d3DrPVrIVD
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2023
IPL 2023 : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामधील सामना पाऊसामुळे थांबवण्यात आला आहे. 9.35 वाजेपर्यंत जर पाऊस थांबला तरीसुद्धा सामना 20 ओव्हर्सचा होऊ शकतो. मात्र आता पाऊस थांबण्याची वाट पाहावी लागणार आहे. 9.35 पर्यंत जरी पाऊस थांबला नाहीतर तर 12.35 पर्यंत थांबला तर 5 ओव्हर्सची मॅच होणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये आज 16 व्या सीजनचा फायनल सामना खेळला जाणार आहे. या मॅचआधी हवामान बिघडलं असून पाऊस सुरु झालाय.
फायनलच्या आधी चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू अंबाती रायुडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावरुन निवृत्ती जाहीर केली.
पाऊस फायनलचा खेळ बिघडवू शकतो. रात्री 8 ते 9 दरम्यान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. एक्यूवेदरनुसार, आकाशात काळे ढग असतील.
IPL 2023 Final : CSK ने दोघांचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात दोघे आपलं रिलेशनशिप आणि परस्पराबद्दलच्या बॉन्डबद्दल बोलताना दिसतायत. चेन्नई सुपर किंग्सला IPL 2023 च्या फायनलमध्ये पोहोचवण्यात त्याची महत्वाची भूमिका आहे. वाचा सविस्तर….
Ruturaj Gaikwad Play MPL : लग्नामुळे WTC फायनलसाठी जाता येणार नाही. इंग्लंडला जाता येणार नाही, हे दु:ख विसरण्याचा प्लान तयार. महाराष्ट्राचे कुठले टॉप प्लेयर या लीगमध्ये खेळणार? वाचा सविस्तर….
Chennai Super Kings IPL 2023 Final : मोठे प्लेयर नाही, धोनीची बुद्धी CSK ला बनवेल चॅम्पियन. CSK पासून गुजरात टायटन्स आपलं टायटल कसं डिफेंड करणार? CSK ची टीम या 5 गोष्टींमुळे जास्त धोकादायक आहे. वाचा सविस्तर…..
GT vs CSK IPL 2023 Final Weather Report : अहमदाबादमध्ये आज फायनलच्या दिवशी कसं असेल हवामान? आणि पाऊस पडावा अशीच शुभमन गिलसह तमाम गुजरातच्या फॅन्सची इच्छा असेल. वाचा सविस्तर….
Shubman Gill IPL 2023 Final : शुभमन गिलच्या कोचने पृथ्वी शॉ बद्दल धक्कादायक वक्तव्य केलय. शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ यांची तुलना होणं स्वाभाविक आहे. वाचा सविस्तर….
आकड्यांनुसार गुजरात चेन्नईवर वरचढ आहे. गुजरातने चेन्नईवर 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नईने गुजरातवर आयपीएल 2023 क्वालिफायर 1 मध्ये एकमेव विजय मिळवला.
गुजरात सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचली आहे. तर चेन्नई सुपर किंग्सची ही फायनलमध्ये पोहचण्याची 10 वी वेळ ठरली आहे. तसेच चेन्नई एकूण 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.