GT Vs RR, IPL 2022, Final Highlights: गुजरात टायटन्स IPL चे नवीन चॅम्पियन, पहिल्याच सीजनमध्ये कमाल

| Updated on: May 30, 2022 | 6:31 AM

IPL 2022, GT vs RR Final Match Live Updates: गुजरात टाइटंस vs राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२२ फाइनल मैच LIVE : गुजरातने राजस्थानला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राजस्थानने बँगलोरला हरवून फायनलमध्ये प्रवेश मिळवला.

GT Vs RR, IPL 2022, Final Highlights: गुजरात टायटन्स IPL चे नवीन चॅम्पियन, पहिल्याच सीजनमध्ये कमाल
IPL 2022 Gujarat titans ChampionImage Credit source: IPL

Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Match: आय़पीएल 2022 चा किताब कोण जिंकणार, याची प्रतिक्षा आज संपली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज हा फायनलचा सामना खेळला गेला. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये सामना होता. गुजरात टायटन्सने आयपीएमध्ये पहिलं विजेतेपद मिळवलं आहे. राजस्थानने विजयासाठी दिलेलं 131 धावांच लक्ष्य गुजरातने आरामात पार केलं. इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेला 6 वर्षानंतर नवीन चॅम्पियन मिळाला आहे. गुजरात टायटन्सने सात विकेट राखून विजय मिळवला. गुजरात टायटन्सचा हा पहिलाच सीजन होता, तर राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्याच मोसमाचं विजेतेपद मिळवलं होतं. गुजरातने क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात राजस्थानला नमवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. राजस्थान रॉयल्सने क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात RCB ला हरवून 14 वर्षांनी फायनलमध्ये प्रवेश केला होता.

गुजरात आणि राजस्थानची Playing 11

गुजरात टायटन्स Playing 11: हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋदिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिल, राहुल तेवतिया, आर साई किशोर, राशिद खान,  लॉकी फर्ग्यूसन , मोहम्मद शामी, यश दयाल,

राजस्थान रॉयल्स Playing 11: संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर. यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ओबेड मेकॉय, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा,

Key Events

राजस्थानचा संघ अपयशी

दुसऱ्या आयपीएलचे जेतेपद मिळवण्यात राजस्थानचा संघ अपयशी ठरला.

गुजरात नवीन चॅम्पियन

इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेला 6 वर्षानंतर नवीन चॅम्पियन मिळाला आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 29 May 2022 11:41 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: गुजरात टायटन्स IPL चे नवीन चॅम्पियन

    गुजरात टायटन्सने आयपीएमध्ये पहिलं विजेतेपद मिळवलं आहे. गुजरातने याच सीजनमध्ये आयपीएलमध्ये डेब्यू केला होता. या संघाने कमालाची कामगिरी केली आहे. IPL 2022 मध्ये पहिल्या सामन्यापासून या संघाने दमदार कामगिरी केली होती. पॉइंट्स टेबलमध्येही हा संघ पहिल्या स्थानावर होता. गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर सात विकेट राखून विजय मिळवला. राजस्थानने विजयासाठी दिलेलं 131 धावांच लक्ष्य गुजरातने आरामात पार केलं.

  • 29 May 2022 11:28 PM (IST)

    गुजरात टायटन्सच्या तीन बाद 109 धावा

    16 ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सच्या तीन बाद 109 धावा झाल्या आहेत. 24 चेंडूत विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. डेविड मिलर 17 आणि शुभमन गिल 37 धावांवर खेळतोय.

  • 29 May 2022 11:25 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: आयपीएलमधील मानाची Orange Cap

    अखेर Jos Buttler ने मिळवली आयपीएलमधील मानाची Orange Cap

    jos Buttler orange cap

  • 29 May 2022 11:17 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: चहलचा जबरदस्त चेंडू, गुजरातची मोठी विकेट

    राजस्थान रॉयल्सला गुजरातची मोठी विकेट मिळाली आहे. युजवेंद्र चहलने एका अप्रतिम चेंडूवर कॅप्टन हार्दिक पंड्याला स्लीपमध्ये यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद केलं. पंड्याने 30 चेंडूत 34 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 1 षटकार मारला. गुजरातची तीन बाद 86 अशी स्थिती आहे.

  • 29 May 2022 11:09 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: हार्दिक-शुभमनची जोडी जमली

    12 ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सच्या दोन बाद 77 धावा झाल्या आहेत. अश्विनच्या गोलंदाजीवर कॅप्टन हार्दिक पंड्याने हल्लाबोल केला. 15 धावा लुटल्या. हार्दिक 28, शुभमन गिल 29 धावांवर खेळतोय.

  • 29 May 2022 10:53 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: प्रसिद्ध कृष्णाच्या ओव्हरमध्ये दोन चौकार

    9 ओव्हर्समध्ये गुजराच्या दोन बाद 48 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्याने प्रसिद्ध कृष्णाच्या या ओव्हरमध्ये दोन चौकार मारले.

  • 29 May 2022 10:50 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: गुजरातची सावध फलंदाजी

    गुजरात टायटन्सच्या 8 षटकात दोन बाद 38 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 14 आणि हार्दिक पंड्या 4 धावांवर खेळतोय.

  • 29 May 2022 10:47 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: अक्षय कुमारने चाहत्यांना केलं अभिवादन

  • 29 May 2022 10:41 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: पावरप्लेमध्ये गुजरातची खराब सुरुवात

    पावरप्लेमध्ये गुजरात टायटन्सने 6 षटकात दोन बाद 31 धावा केल्या आहेत. हार्दिक पंड्या आणि शुभमन गिलची जोडी मैदानात आहे.

  • 29 May 2022 10:34 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: गुजरातला दुसरा झटका, मॅथ्यू वेड OUT

    गुजरात टायटन्सला दुसरा झटका बसला. मॅथ्यू वेड 8 धावांवर आऊट झाला. बोल्टने रियान परागकरवी त्याला झेलबाद केलं. गुजरातच्या 4.4 षटकात दोन बाद 23 धावा झाल्या आहेत.

  • 29 May 2022 10:19 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: गुजरातला पहिला झटका

    गुजरातला पहिला झटका बसला आहे. दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने वृद्धीमान साहाला क्लीन बोल्ड केलं. साहाने 5 धावा केल्या. गुजरातच्या एक बाद 11 धावा झाल्या आहेत.

  • 29 May 2022 09:57 PM (IST)

    हार्दिक पंड्याचा शानदार खेळ

    आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 130 धावा केल्या आहेत. हार्दिक पंड्याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने संजू सॅमसन, जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर हे महत्त्वाचे विकेट काढले. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक 39 धावा केल्या.

  • 29 May 2022 09:41 PM (IST)

    राजस्थानची सातवी विकेट

    राजस्थानची सातवी विकेट गेली आहे. ट्रेंट बोल्ट 11 धावांवर बाद झाला. साई किशोरने तेवतियाकरवी झेलबाद केलं. 17.3 षटकात राजस्थानच्या 7 बाद 112 धावा झाल्या आहेत.

  • 29 May 2022 09:32 PM (IST)

    राजस्थान रॉयल्सची सहावी विकेट

    राजस्थान रॉयल्सची सहावी विकेट गेली आहे. रविचंद्रन अश्विन 6 धावांवर बाद झाला. साई किशोरने मिलरकरवी झेलबाद केलं. 16 ओव्हर्समध्ये सहा बाद 98 अशी राजस्थानची स्थिती आहे.

  • 29 May 2022 09:26 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: राजस्थानची वाट लागली, पॉवर हिटर हेटमायर OUT

    राजस्थानच्या 15 षटकात पाच बाद 94 धावा झाल्या आहेत. पॉवर हिटर शिमरॉन हेटमायरला हार्दिक पंड्याने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. हेटयमारने 11 धावा केल्या.

  • 29 May 2022 09:16 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: अमित शाह स्टेडियममध्ये उपस्थित

    आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. स्टेडियम परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • 29 May 2022 09:09 PM (IST)

    गुजरातला मिळाली मोठी विकेट, जोस बटलर OUT

    जोस बटलरच्या रुपाने गुजरात टायटन्सला मोठी विकेट मिळाली आहे. हार्दिक पंड्याने हे यश मिळवून दिलं. त्याने विकेटकीपर साहाकरवी झेलबाद केलं. बटलर 39 धावांवर आऊट झाला. राजस्थानची 79/4 अशी स्थिती आहे.

  • 29 May 2022 09:04 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: राजस्थानची तिसरी विकेट

    राशिद खानने राजस्थानला तिसरा झटका दिला आहे. देवदत्त पडिक्कलला अवघ्या 2 धावांवर मोहम्मद शामीकरवी झेलबाद केलं. राजस्थानची स्थिती 79/3

  • 29 May 2022 09:02 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: बटलरने वॉर्नरला मागे टाकलं

    आजच्या सामन्यात जोस बटलरने एक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला. त्याने सर्वाधिक धावा बनवण्याच्या बाबतीत डेविड वॉर्नरला मागे टाकलं. वॉर्नरने 2016 मध्ये 848 धावा केल्या होत्या. बटलर आता पुढे निघून गेला आहे, तो आता दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीच्या नावावर एका सीजनमध्ये 973 धावा आहेत.

  • 29 May 2022 08:59 PM (IST)

    राजस्थानच्या 2 बाद 75 धावा

    11 षटकात राजस्थान रॉयल्सच्या दोन बाद 75 धावा झाल्या आहेत.

  • 29 May 2022 08:56 PM (IST)

    धोकादायक जोस बटलर अजूनही खेळपट्टीवर

    10.2 षटकात राजस्थानच्या दोन बाद 73 धावा झाल्या आहेत. बटलर 37 धावांवर खेळतोय. देवदत्त पडिक्कल त्याला साथ देतोय.

  • 29 May 2022 08:45 PM (IST)

    राजस्थानला दुसरा झटका, कॅप्टन संजू सॅमसन OUT

    राजस्थान रॉयल्सला दुसरा झटका बसला आहे. कॅप्टन संजू सॅमसन 14 धावांवर OUT झाला आहे. हार्दिक पंड्याने साई किशोरकरवी झेलबाद केलं

  • 29 May 2022 08:40 PM (IST)

    राजस्थानच्या एक बाद 59 धावा

    8 ओव्हर्समध्ये राजस्थानच्या एक बाद 59 धावा झाल्या आहेत. जोस बटलर आणि संजू सॅमसनची जोडी जमली आहे. दोघांमध्ये 28 धावांची भागीदारी झाली आहे. राशिद खानने आठवी ओव्हर टाकली. बटलर 22 आणि सॅमसन 14 धावांवर खेळतोय.

  • 29 May 2022 08:30 PM (IST)

    स्टेडियममध्ये अक्षय कुमार

    आयपीएल फायनल पहायला अक्षय कुमार उपस्थित आहे. त्याच्याशेजारी रणवीर सिंह बसला आहे. पावरप्लेच्या सहा षटकात राजस्थानच्या एक बाद 44 धावा झाल्या आहेत.

  • 29 May 2022 08:28 PM (IST)

    बटलर-संजू सॅमसनची जोडी मैदानात

    पाच ओव्हर्समध्ये राजस्थानच्या एक बाद 37 धावा झाल्या आहेत. बटलर 9 आणि संजू सॅमसन पाच धावांवर खेळतोय.

  • 29 May 2022 08:23 PM (IST)

    आधी SIX नंतर यशस्वी जैस्वाल OUT

    चार ओव्हर्समध्ये राजस्थानच्या एकबाद 31 धावा झाल्या आहेत. यशस्वी जैस्वालच्या रुपाने पहिला विकेट गेला. यश दयालने त्याला साई किशोरकरवी झेलबाद केले. यशस्वीने 22 धावा केल्या. यात दोन षटकार आणि एक चौकार लगावला.

  • 29 May 2022 08:16 PM (IST)

    मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर हल्लाबोल

    मोहम्मद शमीने तिसरं षटक टाकलं. यशस्वी जैस्वालने या ओव्हरमध्ये एका चौकार आणि एक षटकार मारला. राजस्थानच्या बिनबाद 21 धावा झाल्या आहेत.

  • 29 May 2022 08:11 PM (IST)

    दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला चौकार

    यश दयालने दुसरं षटक टाकलं. जोस बलटरने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. राजस्थानच्या बिनबाद 7 धावा झाल्या आहे.

  • 29 May 2022 08:06 PM (IST)

    फायनल मॅचला सुरुवात

    IPL 2022 फायनलला सुरुवात झाली आहे. मोहम्मद शमीने पहिलं षटक टाकलं. जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल ही राजस्थानची सलामीची जोडी मैदानात आहे. राजस्थानच्या बिनबाद 2 धावा झाल्या आहेत.

  • 29 May 2022 07:59 PM (IST)

    आज आयपीएलला मिळणार नवीन चॅम्पियन

    View this post on Instagram

    A post shared by IPL (@iplt20)

  • 29 May 2022 07:38 PM (IST)

    गुजरात टायटन्स Playing 11

    हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋदिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, आर साई किशोर, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन , मोहम्मद शामी, यश दयाल,

    अल्जारी जोसेफच्या जागी आज अनुभवी लॉकी फर्ग्युसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.

  • 29 May 2022 07:37 PM (IST)

    अशी आहे राजस्थानची प्लेइंग 11

    राजस्थान रॉयल्स Playing 11: संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर. यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ओबेड मेकॉय, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा,

  • 29 May 2022 07:33 PM (IST)

    कॅप्टन संजू सॅमसनने फायनलचा टॉस जिंकला

    राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनने फायनलचा टॉस जिंकला. त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळपट्टीपाहून फलंदाजी स्वीकारल्याचं संजूने सांगितलं. संघात कोणताही बदल केला नसल्याचं त्याने सांगितलं.

  • 29 May 2022 07:29 PM (IST)

    ‘जय हो’ गाण्यावर रणवीर आणि AR रेहमान यांचा एकत्र परफॉर्मन्स पहा

  • 29 May 2022 07:25 PM (IST)

    AR रेहमान यांचा शानदार परफॉर्मन्स

  • 29 May 2022 07:22 PM (IST)

    क्रिकेट जर्सीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

    आयपीएलने सर्वात मोठ्या क्रिकेट जर्सीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. क्लोजिंग सेरेमनीच्या आधी ही जर्सी सादर करण्यात आली. जर्सीवर सर्व 10 संघांचे लोगो आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि आयपीएल अध्यक्ष बृजेश पटेल यांनी गिनीज रेकॉर्ड स्वीकारला.

  • 29 May 2022 07:19 PM (IST)

    क्लोजिंग सेरेमनीमध्ये रणवीरने असे भरले रंग

  • 29 May 2022 07:16 PM (IST)

    भारतीय क्रिकेटची 75 वर्ष

  • 29 May 2022 07:14 PM (IST)

    क्लोजिंग सेरेमची एक VIDEO बघा

    View this post on Instagram

    A post shared by IPL (@iplt20)

  • 29 May 2022 06:57 PM (IST)

    AR रेहमान यांच्या परफॉर्मन्सला सुरुवात

    रणवीर सिंहचा तुफानी परफॉर्मन्स संपला असून आता प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक AR रेहमान यांच्या परफॉर्मन्सला सुरुवात झाली आहे.

  • 29 May 2022 06:48 PM (IST)

    रणवीर सिंह म्हणजे एनर्जी

    रणवीर सिंह म्हणजे एनर्जी. आयपीएलच्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये रणवीर सिंह तसाच परफॉर्मन्स सादर करत आहे. बॉलिवूडच्या वेगवेगळ्या गाण्यांवर त्याने ठेका धरला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम प्रेक्षकांनी खच्चून भरलं आहे. प्रेक्षक या परफॉर्मन्सचा मनापासून आनंद लुटत आहेत.

  • 29 May 2022 06:39 PM (IST)

    क्लोजिंग सेरेमनीमध्ये रणवीर सिंहचा परफॉर्मन्स सुरु

    क्लोजिंग सेरेमनीमध्ये रणवीर सिंहच्या परफॉर्मन्सला सुरुवात झाली. 83 चित्रपटातील गाण्यावर नृत्य सुरु आहे.

  • 29 May 2022 06:37 PM (IST)

    नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक नजर मारा

    View this post on Instagram

    A post shared by IPL (@iplt20)

  • 29 May 2022 06:33 PM (IST)

    स्टेडियम प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं

    नरेंद्र मोदी स्टेडियम प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं आहे. जगातलं हे सर्वात मोठं स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये प्रेक्षकांची आसनव्यवस्था 1.32 लाख आहे. क्लोजिंग सेरेमनीला सुरुवात झाली आहे.

    View this post on Instagram

    A post shared by IPL (@iplt20)

  • 29 May 2022 06:17 PM (IST)

    जाणून घ्या Pitch Report

    आज अहमदाबादमध्ये हवामान कसं असेल? लिंकवर क्लिक करुन जाणून घ्या 

  • 29 May 2022 06:15 PM (IST)

    चार वर्षानंतर क्लोजिंग सेरेमनी

    आयपीएल मध्ये 2018 नंतर पहिल्यांदा क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्यात आली आहे. 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद झाल्याने ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी झाली नव्हती. 2020 आणि 2021 मध्ये कोरोनामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता.

  • 29 May 2022 05:54 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: टायटन्स सज्ज

  • 29 May 2022 05:20 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: बटलरची नजर विराट रेकॉर्डवर

    राजस्थानला अंतिम सामन्यात बटलरकडून भरपूर अपेक्षा आहेत. बटलरची नजर आज विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडण्यावर असेल. बटलरने क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात आरसीबी विरुद्ध चौथं शतक झळकावलं होतं.

  • 29 May 2022 05:17 PM (IST)

    Gujarat vs Rajasthan Live: क्लोजिंग सेरेमनीच्या तयारीमध्ये गुंजलेला रणवीर सिंह

  • 29 May 2022 03:23 PM (IST)

    राजस्थान रॉयल्सचं महत्त्वाचं पाऊल

    IPL 2022 चा फायनल सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये होणार आहे. सामन्याआधी राजस्थान रॉयल्स 2008 च्या चॅम्पियन संघातील सदस्यांना सन्मानित करेल.

  • 29 May 2022 03:21 PM (IST)

    नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम का आहे?

    काय आहेत इथली वैशिष्ट्य जाणून घ्या….

    Narendra Modi Stadium

  • 29 May 2022 02:41 PM (IST)

    IPL विजेत्या संघाला किती कोटीचं इनाम मिळणार? जाणून घ्या

    IPL मध्ये विजेत्या संघाला 20 कोटी रुपये तर पराभूत संघाला 13 कोटी रुपये मिळतील. आरसीबीला 7 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सच्या खात्यात 6.50 कोटी रुपये जमा होतील.

  • 29 May 2022 02:38 PM (IST)

    राजस्थान Playing XI च्या 7 खेळाडूंवर हा ‘गुजराती’ एकटा भारी पडू शकतो,

    Gujarat vs Rajasthan LIVE Updates: राजस्थान Playing XI च्या 7 खेळाडूंवर हा ‘गुजराती’ एकटा भारी पडू शकतो, रेकॉर्डचं आहे तसा

    Rajasthan Royals

  • 29 May 2022 01:25 PM (IST)

    फायनलपूर्वी राणवीर सिंह करणार ‘खलीबली

    निती मोहनने पोस्ट केले व्हिडीओ पाहा

  • 29 May 2022 11:21 AM (IST)

    गुजरात फायनलमध्ये गेली म्हणून मोदीही मॅच बघायला येणार?

    गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा सामना पाहण्यासाठी  एक लाखाहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा आहे. हा सामना पाहण्यासाठी एक लाख 10 हजाराहून अधिक प्रेक्षक पोहोचले तर हा एक विश्वविक्रम ठरेल. दरम्यान, गुजरात फायनलमध्ये गेली म्हणून मोदीही मॅच बघायला येणार, अशीही चर्चा संध्या रंगली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील सामना पाहण्यासाठी येण्याची शक्यता आहे. गुजरात फायनलला गेली म्हणून पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री फायनल पाहण्यासाठी जाणार असल्याची वेगळीच चर्चा देखील रंगली आहे.

    pm (1)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अअमित शाह देखील सामना पाहण्यासाठी येण्याची शक्यता आहे.

  • 29 May 2022 11:18 AM (IST)

    केरळच्या विविध भागात मान्सूनचं आगमन, हवामान विभागाची माहिती

    केरळच्या विविध भागात मान्सूनचं आगमन, हवामान विभागाची माहिती

    मान्सूनची आनंदाची बातमी

    केरळात मान्सूनचं झालं आगमन

    मान्सून लवकरच सक्रीय होणार

    5 ते 6 तारखेला दक्षिण गोव्यात मान्सून दाखल होणार

    तर संपूर्ण महाराष्ट्रात 14 ते 15 तारखेला दाखल होण्याची शक्यता

    हवामान विभागाची माहिती

  • 29 May 2022 10:36 AM (IST)

    विजेत्या संघाला 2008 मध्ये 4.8 कोटी रुपये मिळाले

    आयपीएलचा पहिला सीझन 2008 मध्ये खेळला गेला त्यादरम्यान शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले. त्यावेळी आरआरला 4.8 कोटी रुपये मिळाले होते. ही लीग जसजशी जगभर लोकप्रिय होत गेली तसतशी बक्षिसांची रक्कमही वाढत गेली. आजघडीला जेतेपद पटकावणाऱ्या संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळते.

  • 29 May 2022 10:35 AM (IST)

    आयपीएल 2022 बक्षीस रक्कम

    1. विजेता – 20 कोटी
    2. उपविजेते – 13 कोटी
    3. तिसरे स्थान – 7 कोटी
    4. चौथे स्थान – 6.5 कोटी
  • 29 May 2022 09:50 AM (IST)

    शहिद सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव काही वेळात विसापुर गावात पोहचेल

    शहिद सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव काही वेळात विसापुर गावात पोहचेल

    प्रथम कुटुंबियांच्या दर्शनासाठी घरी आणणार

    नंतर गावातुन अंत्ययात्रा निघेल

  • 29 May 2022 09:42 AM (IST)

    दोन्ही संघांची प्लेइंग 11

    राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा ओबेड मेकॉय,

    गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋदिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, अल्जारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी

Published On - May 29,2022 9:39 AM

Follow us
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.