ipl 2024 हार्दिक पंड्याची जागा भरून काढण्यासाठी गुजरात टायटन्स ‘या’ खेळाडूंवर पाडणार पैशांचा पाऊस
ipm auction 2024 : यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये हार्दिक पंड्या याच्या जाण्याने गुजरातला मोठा धक्का बसलाय. हार्दिकच्या जागी लिलावामध्ये गुजरात कोणत्या संघावर सर्वाधिक पैस लावणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.
मुंबई : यंदाच्या आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) सीझनआधी गुजरात टायटन्स संघाला मोठा झटका बसला आहे. मुंबई इंडियन्स संघाने थेट गुजरातच्या कर्णधारालाच ट्रेड केलं. हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरातने पहिल्याच वर्षी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर दुसऱ्या सीझनमध्येही गुजरात फायनलमध्ये गेली होती. मात्र चेन्नईने फायनलमध्ये गुजरातला पराभूत केलं होतं. यंदा आता हार्दिक पंड्याविना संघ उतरणार असून युवा खेळाडू शुबमव गिल कॅप्टन असणार आहे. परंतु हार्दिकची कसर भरून काढणारा खेळाडू गुजरातला लिलावात शोधावा लागणार आहे.
कोण आहेत ते खेळाडू?
गुजरातसाठी हार्दिकची जागा भरून काढणारा खेळाडू मिळणं कठीण आहे. मात्र असे काही खेळाडू आहेत जे गुजरातने आपल्या ताफ्यात घेतली तर त्यांची ताकद आणखी वाढू शकते. यामध्ये एका भारतीय तर तीन विदेशी खेळाडूंचं नाव चर्चेत आहे. यामधील पहिला खेळाडू रचिन रवींद्र आहे. न्यूझीलंड संघाच्या या ऑल राऊंडर खेळाडूसाठी गुजरात पैसा लावण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपमध्ये रचिनने दमदार कामगिरी केलेली, सराव सामन्यात पठ्ठ्याने शतक केलं होतं. त्यानंतर त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आणि संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. यंदाच्या लिलावामध्ये त्याची बेस प्राईज ही 50 लाख आहे.
दुसरा खेळाडू म्हणजे ट्राविस हेड असून सेमी फायनल आणि फायनलमध्ये पठ्ठ्याने केलेल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर कांगारूंनी वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरलं. वर्ल्ड कपमध्ये हेडने बॉलिंगही केलेली पाहायला मिळाली. भारतीय मैदानांवर गड्याने चांगलं प्रदर्शन केलं होतं. याचाच फायदा त्याला लिलावामध्ये होऊ शकतो. गुजरात संघ हेडसाठी पैसा लावण्याची जास्त शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा हा भरवशाच्या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी या फ्रंचायझींमध्ये चढीओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
तिसरा खेळाडू ऑस्ट्रेलिया संघाचा घातक गोलंदाज मिचेल स्टार्कसुद्धा यंदा लिलावामध्ये उतरला आहे. स्टार्कने आपली बेस प्राईज ही 2 कोटी इतकी ठेवली आहे. गुजरात हार्दिकचे मिळालेले पंधरा कोटी स्टार्कवर लावण्याची शक्यता आहे. कारण आता संघात मोहम्मद शमी, मोहित शर्मा सोडता इतर कोणताही फास्टर नाही. त्यामुळे बॉलिंग आणखी मजबूत करण्यासाठी गुजरात टीम मॅनेजमेंट स्टार्कवर पैसा लावू शकते.
चौथा खेळाडू हा भारतीय असून लॉर्ड ठाकूर म्हणून ओळखला जातो. शार्दुल ठाकूर हासुद्धा चांगला फलंदाज असून एक पर्फेक्ट ऑल राऊंडर आहे. कोलकाताने त्याला रीलिज केलं असून गुजरात त्याला आपल्या संघात घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. शार्दुलने मागील सीझनमध्ये कोलकाताकडून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकलं होतं. यंदाच्या लिलावात शार्दुलचीही बेस प्राईज ही 2 कोटी आहे.
शुबमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, आर साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा