IPL 2022, GT vs MI : गुजरात टायटन्सने टॉस जिंकला, मुंबई इंडियन्सची पहिले फलंदाजी, जाणून घ्या संघातील बदल
गुजरात टायटन्स हा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. यासंघाने आतापर्यंत एकूण एकूण दहा सामना खेळले आहेत.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सचा (GT) सामना मुंबई इंडियन्ससोबत (MI) होणार आहे. गुजरात टायटन्सने टॉस जिंकला असून मुंबई इंडियन्स पहिले फलंदाजी करणार आहे. पॉईंट्स टेबलचा विचार केल्यास गुजरात टायटन्स हा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. यासंघाने आतापर्यंत एकूण एकूण दहा सामना खेळले आहेत. त्या सामन्यांपैकी आठ सामने गुजरात टायन्सने जिंकले आहेत. तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. गुजरातचा नेट रेट 0.158 इतका या संघाला पॉईंट्स टेबलमध्ये सोळा पॉईंट्स मिळाले आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने एकूण नऊ सामने आतापर्यंत खेळले असून इंडियन्सला फक्त एक सामना जिंकता आलाय. इंडियन्सचा नेट रेट -0.836 इतका असून पॉईंट्स टेबलमध्ये इंडियन्सला फक्त दोन पॉईट्स मिळाले आहेत.
गुजरात टायटन्सने टॉस जिंकला
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
मुंबई इंडियन्स संघात बदल?
Kaisi lagi aaj ki ??????? ??, Paltan? ??
1⃣ change from the last match.
➡️ Ashwin ⬅️ Shokeen#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #GTvMI @Dream11 pic.twitter.com/rgK8ikiLSj
— Mumbai Indians (@mipaltan) May 6, 2022
गुजरातच्या संघात बदल?
?????????
That’s how we line up for the epic ⚔️ #GTvMI#SeasonOfFirsts #AavaDe pic.twitter.com/Xt4FiE8SvJ
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 6, 2022
दुसऱ्या संघाचं गणित मात्र नक्की बिघडेल
मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या शक्यता संपल्या आहेत. पण मुंबईने हा सामना जिंकला, तर दुसऱ्या संघाचं गणित मात्र नक्की बिघडू शकतं. या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य़ म्हणजे हार्दिक पंड्या पहिल्यांदा मुंबई इंडियन्स विरुद्ध मैदानात उतरेल. मागच्या सीजनपर्यंत हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. मुंबई इंडियन्सने त्याला रिटेन केलं नाही. गुजरात टायटन्सने त्याला कॅप्टन बनवलं.
शुभमन गिलच्या फॉर्मच काय?
गुजरातची टीम या सीजनमध्ये दमदार प्रदर्शन करत आहे. पण वरच्या फळीतील फलंदाज त्यांची समस्या आहेत. शुभमन गिल फॉर्ममध्ये नाहीय. ऋदिमान साहाच्या खेळात सातत्य दिसलेलं नाही. मागच्या सामन्यात साई सुदर्शनने चांगली इनिंग खेळली होती. पण फिल्डिंग करताना त्याला दुखापत झाली. तो फिट नसेल, तर अभिनव मनोहरला संधी मिळू शकते. यश दयाल सुद्धा फिट झाला आहे. तो प्रदीप सांगवानच्या जागेवर खेळू शकतो.
दोन्ही टीम्सची संभाव्य प्लेइंग – 11
? Team News ?@gujarat_titans remain unchanged.
1⃣ change for @mipaltan as M Ashwin is named in the team.
Follow the match ▶️ https://t.co/2bqbwTHMRS #TATAIPL | #GTvMI
A look at the Playing XIs ? pic.twitter.com/Bi6um60BJJ
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2022
गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, ऋदिमान साहा, साई सुदर्शन/अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ, प्रदीप सांगवान/यश दयाल, लॉकी फर्ग्युसन,
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, टिम डेविड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, डॅनियल सॅम्स, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह